Home नाशिक ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थी यांना मोफत एस. टी. प्रवास मिळावा म्हणुन...

ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थी यांना मोफत एस. टी. प्रवास मिळावा म्हणुन मोहन कांबळे यांचे अप्पर जिल्हाधिकारी यांना निवेदन..             

418

आशाताई बच्छाव

Screenshot_20230617-062544_WhatsApp.jpg

ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थी यांना मोफत एस. टी. प्रवास मिळावा म्हणुन मोहन कांबळे यांचे अप्पर जिल्हाधिकारी यांना निवेदन..                              मालेगांव,(आंशूराज पाटील राऊत युवा मराठा न्युज नेटवर्क)

महाराष्ट्र शासनाने मुलींच्या शिक्षणाकरिता सर्वतोपरी प्रयत्न केलेले आहेत. ग्रामीण भागातील पालकांची आर्थिक परिस्थिती गरिबीची असल्यामुळे, ग्रामीण भागातील मुली शिक्षण घेऊ शकत नाही, त्याकरिता मुलींना शाळेत दाखल करण्या करीत पालकांना प्रवृत्त करण्यासाठी, तसेच त्यांना शाळेत टिकवून ठेवण्यासाठी जुन 1966 पासुन इयत्ता ५ वी ते १० वी पर्यंत च्या ग्रामीण भागातील मुलींना शाळेत जाण्याकरिता एस.टी. ने मोफत प्रवास करण्याची सवलत देण्याचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता, तसेच या बाबत खालील निर्णय घेतला आहे..
शासन निर्णय– ग्रामीण भागातील इयत्ता ५ वी ते १० वी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी एस.टी. ने मोफत प्रवास करण्याची सवलत सन 1996- 1997 या शैक्षणिक वर्षापासुन देण्याचे शासनाने ठरविले आहे, ही योजना जून 1966 पासून अंमलात येत आहे. या योजनेला अहिल्याबाई होळकर मुलींना मोफत प्रवास योजना असे संबोधण्यात यावे
तरी या योजनेचे ग्रामीण भागातील मुलींना लाभ मिळावा असे मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्ते, साधन, सुविधा व आस्थापना शहर अध्यक्ष मोहन पुंडलिक कांबळे यांनी केली आहे..

Previous articleशासन आपल्या दारी उपक्रम चळवळ म्हणून राबवा : पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील
Next articleमोदी – 9 महा जनसंपर्क अभियानाअंतर्गत मुरूमगाव येथील अंगणवाडी सेविकांचा सत्कार
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.