Home जळगाव साकेगाव शिवारात महसूल प्रशासनाच्या तत्काळ कार्यवाही मुळे अवैध ९५ – ९८ ब्रास...

साकेगाव शिवारात महसूल प्रशासनाच्या तत्काळ कार्यवाही मुळे अवैध ९५ – ९८ ब्रास रेती साठा जप्त !

132
0

आशाताई बच्छाव

IMG-20230617-WA0018.jpg

साकेगाव शिवारात महसूल प्रशासनाच्या तत्काळ कार्यवाही मुळे अवैध ९५ – ९८ ब्रास रेती साठा जप्त !

जळगांव जिल्हा ब्यूरो चिफ, योगेश पाटील, भुसावळ. – भुसावळ तालुक्यातील मौजे साकेगाव सर्वे नंबर तीन व चार वाघूर नदी लगत अज्ञात इसमांनी ग्रामपंचायत मालकीची मिळकतीवर वेगवेगळ्या पाच ठिकाणी ९५ ते ९८ ब्रास वाळू साठा अवैधरित्या केला असल्याचे उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील यांना मिळालेल्या माहिती वरून त्यांनी दिलेल्या आदेशानुसार कुऱ्हे पानाचे मंडळ अधिकारी व तलाठी यांनी मिळून कारवाई केली.
याबाबत मंडळ कुऱ्हे पानाचे यांनी कर्मचाऱ्यांना बोलावून सांगितले की, मौजे साकेगाव सर्वे नंबर तीन व चार वाघूर नदी लगत अज्ञात इसमांनी ग्रामपंचायत मालकी ची मिळकतीवर वेगवेगळ्या ठिकाणी वाळू (रेती) साठा केलेला आहे. या माहितीच्या आधारे (ता. १६) रोजी सकाळी ११ वाजता प्रत्यक्ष ग्रामपंचायत मालकीचे जुना वाघुर नदी वरील पुलालगत तीन ब्रास साठा आढळून आला. सदर साठा कोणाचा आहे, याबाबत कोणीही माहिती दिली नाही. सदर गटाच्या उत्तरेकडील वीटभट्टी
जवळ अंदाजे पाच ते सहा ब्रास वाळूचा साठा दिसून आला त्याबाबतही कोणाचा आहे असे विचारणा केली असता कोणीही मालकी हक्क दाखविला नाही. सर्वे नंबर ४ च्या उत्तरेकडील पोल्ट्री फार्मच्या खालच्या बाजूस काटेरी झुडपात अंदाजे ३५ ते ४० ब्रास वाळूचा रेतीचा साठा दिसून आला. सदरील वाळू साठा कुणाच्या मालकीचा आहे, याबाबत कोणीही माहिती दिली नसल्याने सदरील साठा अवैधरित्या अज्ञात व्यक्तीने केला असल्याचे दिसून येत आहे. या गटातील उत्तरेस दोन ढिग आढळून आले. त्यापैकी एका ढिगामध्ये २८ ते ३० ब्रास वाळूसाठा व दुसऱ्या ढिगामध्ये २ ते ३ ब्रास वाळू साठा आढळून आला. सदरील याच गटात उत्तरेकडेस आणखी १८ ते २० ब्रास वाळू रेती साठा व अवैधरित्या आढळून आला. कोणीही मालक समोर आला नाही असे ५ वेगवेगळ्या ठिकाणी अंदाजे ९५ ते ९८ ब्रास वाळू साठा अवैधरित्या केला असल्याचे दिसून आल्याने मा. उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील यांच्या आदेशावरून तलाठी मिलिंद तायडे, मंडळ अधिकारी योगिता पाटील व कोतवाल जितेंद्र चौधरी अशांनी मिळून वाळू साठा जप्त करून कारवाई केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here