Home जळगाव श्री संत गजानन महाराज दिव्य संगीतमय चरीत्र कथा सोहळा. दरबार गजाननाचा.

श्री संत गजानन महाराज दिव्य संगीतमय चरीत्र कथा सोहळा. दरबार गजाननाचा.

48
0

आशाताई बच्छाव

1000282158.jpg

श्री संत गजानन महाराज दिव्य संगीतमय चरीत्र कथा सोहळा.
दरबार गजाननाचा.
जळगाव दि . १३.०४.०२४ नरेंद्र पाटील , युवा मराठा न्यूज विभाग संपादक
श्री संत गजानन महाराज भक्त परिवार सुप्रीम कॉलोनी एम आय डी सी एरिया जळगाव येथे साला बाधा प्रमाणे यावर्षी सर्व भाविकांच्या कृपा आशीर्वादाने भव्य संगीतमय कथेचे आयोजन केले असुन आज कथेचा पाचवा दिवस असून कथा अगदी आनंदात पार पडत असुन सर्व भक्त अगदी महाराजांच्या नाट्य चित्र फिती द्वारे कथेचा मनसोक्त आनंद घेत आहेत . कथेचा प्रारंभ दि . ०९.०४.०२४ ते सांगता दि . १६.०४.०२४ पर्यंत कथा प्रवक्ते ह. भ. प. सुजित महाराज , जळगाव कर हे आहेत तर त्यांच्या सोबतीला स्वर अलंकार : -विशाल महाराज चितोडा , ताल महर्षी :- भुषण महाराज , शेळावे सिंथो सायझर :- ऑटोपायड वादक रुपेश महाराज , मलकापूर . यांच्या सोबतीने कथा अगदी आनंदात पार पडत आहे तसेच १६.०४.०२४ रोजी सकाळी ९ते ११ वा. ह. भ. प . सुजित महाराज यांचे काल्या चे कीर्तन आणि महाप्रसाद चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे . तसेच या कथेचे सर्व श्रय हे स्वर्गीय . ह. भ . प संतोष महाराज यांचे आहे. आज या ठिकाणी जो काही आनंद आणि रस आहे तो यांच्या मुळे आहे. गजानन महाराज यांचे मूर्ती ची स्थापना संतोष जी महाराज यांनी भक्त गणाच्या मनात रोवली त्यामुळे हे साध्य झाले आज ते आपल्या मध्ये नाही परंतु त्यांचा सहवास नेहमी आपल्या सर्वांना महराजच्या स्वरूपात आपणा सर्व समोर आहे . तरी संतोष महाराज यांच्या आत्म्याला शांति लाभो ही गजानन महाराज यांच्या चरणी प्रार्थना करू. आणि कथेचा आंनद घेऊया . गजानन महाराज यांचा नाम मंत्र गण गण गणात बोते या गजरात रमून जावू या
जय गजानन श्री गजानन .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here