Home जळगाव संस्कार भारती समिती, चाळीसगाव आयोजित……………………… नववर्ष स्वागत समितीचाआदर्श सांस्कृतिक परंपरा असलेला.. भक्ती...

संस्कार भारती समिती, चाळीसगाव आयोजित……………………… नववर्ष स्वागत समितीचाआदर्श सांस्कृतिक परंपरा असलेला.. भक्ती संगीत व सामूहिक गुढी उभारणीचा कार्यक्रम मोठया उत्साहात संपन्न

24
0

आशाताई बच्छाव

1000275884.jpg

संस्कार भारती समिती, चाळीसगाव आयोजित………………………
नववर्ष स्वागत समितीचाआदर्श सांस्कृतिक परंपरा असलेला.. भक्ती संगीत व सामूहिक गुढी उभारणीचा कार्यक्रम मोठया उत्साहात संपन्न
चाळीसगाव,(विजय पाटील ): संस्कार भारती समिती चाळीसगावच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे ह्या वर्षी देखील मंगळवार दिनांक : ९ / ४ / २०२४ रोजी सकाळी ठिक :८ वाजता गुढीपाडवा व मराठी नववर्षानिमित्त भक्ती संगीत व सामुहिक गुढी उभारण्याचा कार्यक्रम प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विद्यालय, लक्ष्मीनगर, चाळीसगाव येथे संपन्न झाला. यावेळी भक्ती संगीत कार्यक्रम अनेक मधुर गीतांनी सुगंधाळला . त्यात केशरी सुगंध पेरण्याचं काम शुभांगी संन्यासी, राजाभाऊ कुळकर्णी ,अर्चना चौधरी ,सुहासिनी पाठक ,पुष्कर घाटे व शंकर पाठक यांनी केले .सर्व प्रेक्षकांनी वेळेवर टाळ्याची साथ दिली .हार्मोनियमवर सांगित विभागप्रमुख शंकर पाठक होते तर तबल्याची साथ चैतन्य पाठक यानी दिली .झांजवर सुधीर उबाळे होते. या कार्यक्रमामुळे सर्व रसिक जन मंत्रमुग्ध झाले होते . यानंतर सामुहिक गुढी विधीवत मंत्रोपचाराने, गावातील प्रतिष्ठित नागरिक चित्रसेन पाटील, बाबासाहेब चंद्रात्रे, डॉक्टर मुकुंद करंबेळकर , बाळासाहेब नागरे, लालचंदजी बजाज, भूषण ब्राह्मण कार, शंतनू पटवे ,चंद्रशेखर उपासनी , रविंद्र राणा, प्रजापती ब्रह्मकुमारीच्या वंदना दीदी, सुनिता दीदी यांच्या उपस्थितीत वेद मंत्रोपचाराने करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र देशपांडे यांनी केले तर आभार समितीचे अध्यक्ष गितेश कोटस्थाने यांनी मानले . कार्यक्रम यशस्वीतेसाठी शालिग्राम निकम ,सचिव विवेक घाटे, . प्रकाश कुलकर्णी ,
दिलीप संन्यासी, आधार महाले ,कवी रमेश पोतदार ,रत्नप्रभा नेरकर, मनीषा देशपांडे, स्वरा कोटस्थाने यांनी विशेष परिश्रम घेतले .एकंदरीत कार्यक्रम छान सादर झाला.

Previous articleराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्या पक्षा कडुन रावेर लोकसभेची उमेदवारी जाहीर .
Next articleअड्याळ येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त 11ते 15 एप्रिल पर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here