Home जळगाव जैन समाजातर्फे आयोजित रक्तदान शिबीरास 77 रक्तदात्यांचे रक्तदान

जैन समाजातर्फे आयोजित रक्तदान शिबीरास 77 रक्तदात्यांचे रक्तदान

15
0

आशाताई बच्छाव

1000293595.jpg

 

जैन समाजातर्फे आयोजित रक्तदान शिबीरास 77 रक्तदात्यांचे रक्तदान
चाळीसगाव,(विजय पाटील तालुका प्रतिनिधी)– येथील समस्त जैन समाजाच्या वतीने श्री भगवान महावीर स्वामी जन्मकल्याणक महोत्सवानिमित्ताने रक्तदान शिबीराचे आयोजन मंगळवार दि. 16 एप्रिल 2024 रोजी सकाळी 9.30 वा. छत्रपती शिवाजी महाराज चौकातील अरिहंत मंगल कार्यालय येथे करण्यात आले होते.
सदरच्या शिबीरास सर्व समाजातील रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. शिबीरात एकूण 77 रक्तदात्यांनी रक्तदान करुन आपला उत्साह दाखविला. प्रत्येक रक्तदात्याचा 1 लाखाचा अपघाती विमा शिबीरात काढण्यात आला व त्यांना आकर्षक प्रशस्तीपत्रही देण्यात आले.
मा. खासदार उन्मेषदादा पाटील, माजी आमदार राजीवदादा देशमुख, वर्धमानभाऊ धाडीवाल,अप्पर पोलिस अधिक्षक कविता नेरकर, डीवाएसपी अभयसिंग देशमुख, शहर पोलिस निरीक्षक संदीप पाटील आदींनी शिबीरास हजेरी लावली.
शिबीरास जीवन सुरभी ब्लड बँक यांचे सौजन्य लाभले. तर शिबीर यशस्वीतेसाठी जैन समाजातर्फे मनोज सोलंकी, संदीप जैन, हरेश जैन, सुशिल सोलंकी, पवन चोपडा, प्रमोद गुळेचा, निलेश कांकरीया, प्रितेश कटारीया आदींनी प्रयत्न केलेत.

Previous articleडॉ.कल्याण काळे यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी जालन्यात महाविकास आघाडीची महत्वाची बैठक
Next articleसोमेश रेसिडेन्सी भागात दिवसा झालेल्या दारोड्याच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपी जेरबंद
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here