Home जालना सोमेश रेसिडेन्सी भागात दिवसा झालेल्या दारोड्याच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपी जेरबंद

सोमेश रेसिडेन्सी भागात दिवसा झालेल्या दारोड्याच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपी जेरबंद

22
0

आशाताई बच्छाव

1000293636.jpg

सोमेश रेसिडेन्सी भागात दिवसा झालेल्या दारोड्याच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपी जेरबंद
जिल्हा प्रतिनिधी जालना-वसंतराव देशमुख
दिनांक -18/04/2024
याविषयी सविस्तर माहिती अशी की, दिनांक 16 /4/ 2024 रोजी जालना जिल्ह्यातील मालाविरुद्धचे गुन्हे करणाऱ्या आरोपीची माहिती घेऊन त्यांचा शोध घेणेबाबत मा.पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार बंसल व मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्री आयुष नोपाणी यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री रामेश्वर खनाळ यांना सूचना दिल्या होत्या.
त्याअनुषंगाने त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे अमलदार जालना जिल्हा हद्दीतील मालाविरुद्धचे दाखल गुन्ह्यातील आरोपीची माहिती घेऊन शोध घेत असताना खबऱ्यामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की, पोलीस ठाणे सदर बाजार हद्दीतील सोमेश रेसिडेन्सी भागात झालेल्या दिवसा दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी शेख आरिफ शेख मुक्तार राहणार जमुना नगर जुना जालना हा त्याचे राहते घरी जमुना नगर जुना जालना येथे आहे. त्या बातमीच्या आधारे त्यास शिताफीने ताब्यात घेऊन 24900 /रुपये किमतीच्या मुद्देमालासह पोलिस ठाणे सदर बाजार येथे रिपोर्टसह हजर करण्यात आले आहे.
सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार बंसल व मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्री आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री रामेश्वर खनाळ, सपोनी श्री योगेश उबाळे, सॅम्युअल कांबळे, कृष्णा तंगे, सचिन चौधरी, रमेश राठोड, सुधीर वाघमारे, सचिन राऊत, यांनी केलेली आहे.

Previous articleजैन समाजातर्फे आयोजित रक्तदान शिबीरास 77 रक्तदात्यांचे रक्तदान
Next articleअमरावती मतदारसंघात गणित कुणाचे बिघडणार ? भाजपनं काँग्रेस उमेदवार चिंतित,
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here