Home अमरावती अमरावती मतदारसंघात गणित कुणाचे बिघडणार ? भाजपनं काँग्रेस उमेदवार चिंतित,

अमरावती मतदारसंघात गणित कुणाचे बिघडणार ? भाजपनं काँग्रेस उमेदवार चिंतित,

36
0

आशाताई बच्छाव

1000293638.jpg

अमरावती मतदारसंघात गणित कुणाचे बिघडणार ? भाजपनं काँग्रेस उमेदवार चिंतित,
____________
दैनिक युवा मराठा
पी .एन.देशमुख.
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती.
देशाचे पहिले कृषिमंत्री डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख व पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी प्रतिनिधित्व केलेला अमरावती मतदारसंघ हा देशभरात सतत चर्चेत राहिला. यंदा भाजप पहिल्यांदाच या मतदारसंघात निवडणूक लढवीत आहे. काँग्रेसने २८ वर्षानंतर उमेदवार रिंगणात उतरविला आहे. भाजप कडून नवनीत राणा, काँग्रेसचे बळवंत वानखडे,’प्रहार’चे दिनेश बुब तर रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर हे चार प्रमुख उमेदवार मैदानात आहेत. या मतदारसंघात यंदा ३७ उमेदवार रिंगणात आहेत.२०१९ची निवडणूक वगळता शिवसेनेचा बाल किल्ला म्हणून अमरावतीची ओळख होती. मात्र हल्ली शिवसेना गटा गटात गेली आहे. खासदार नवनीत राणा या २०१९च्या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने अपक्ष म्हणून निवडून आल्या होत्या परंतु, काहीच महिन्यात राणांनी केंद्र सरकारसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. त्या भाजपच्या अधिकृत उमेदवार आहेत. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू असलेले आनंदराज आंबेडकर यांची रिपब्लिकन सेनेकडून’वंचित’च्या पाठिंबा ने उमेदवारी कायम आहे. महायुतीचे घटक पक्ष असलेले आमदार बच्चू कडू यांनी प्रहार जनशक्ती पक्षाकडून दिनेश बुब यांना उमेदवारी दिली आहे. आमदार रवी राणा यांच्या विरुद्ध आमदार बच्चू कडू यांनी दंड थोपटल्याचे दिसून येते. एकंदरीत प्रहार, रिपब्लिकन सेनेचे उमेदवार किती मते घेतात? यावर प्रमुख उमेदवारांची भवित्व ठरेल. बसपाचे अॅड. संजय कुमार गाडगे हे सुद्धा रिंगणात आहेत पहिल्यांदाच भाजप आणि २८ निवडणुकीत लढाई दिसते. अमरावती लोकसभा मतदारसंघ हा अनुसूचित जाती राखीव जागेसाठी आहे. मात्र यंदा लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच भाजपने स्वातंत्रपणे’कमळ’वर नवनीत राणा यांना उमेदवारी दिली आहे. तर तब्बल २८ वर्षानंतर काँग्रेस’पंजा’घेऊन मैदानात निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. वानखडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यापूर्वी नवनीत राणा या अपक्ष म्हणून निवडून आल्या होत्या, हे विशेष. महायुती आणि महाविकास आघाडी कडून उमेदवाराच्या विजयासाठी मोर्चा बांधणी केली जात आहे. पदयात्रा, रॅली, कॉर्नर बैठका, थेट भेटीसाठी वर भर दिला जात आहे. मात्र राज्य राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांच्या सभेनंतर चित्र संकेत आहे. नवनीत राणा यांनी भाजपची उमेदवारी आणून अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. भाजपचे निष्ठावंत आणि काही स्थानिक नेते अध्यापही या धक्क्यातून सावरले नाही. राणा सोबत प्रचाराला फिरत असली तरी त्यांच्या मनात वेगळेच आहे. प्रहार चे दिनेश बुब, रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर यांच्या उमेदवाराचा कोणाला फटका बसणारे देखील महत्त्वाचे ठरणार आहे. आमदार सुलभा खोडके या काँग्रेस पासून अंतर ठेवून आहे. एकूण मतदार १८,३६,०७८. आहेत. पुरुष-९,४४,२१३. महिला-८,९१७८० असे आहेत. जिल्ह्यात उद्योग धंदा चा अभाव आहे. अमरावती पंचतारांकीत एमआयडीसी असूनही येथे एकही मोठा प्रकल्प नाही. बेलोरा विमानतळाचे भिजत घोंगडे कायम आहे. विमानाच्या टेक ऑफ ची प्रतीक्षा आहे. संत्रा उत्पादन मोठ्या प्रमाणात होत असेल तरी त्यावर प्रक्रिया करणारा एकही प्रकल्प नाही. प्रत्येक लोकसभा निवडणुकीत संत्र प्रक्रिया आणि शेतकरी प्रश्नावर राजकारण केले जाते. बेरोजगारी समस्या असून, उच्चशिक्षितांना नोकरी नाही. राज्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या अमरावती जिल्ह्यात होत असल्याची नोंद आहे. नवनीत राणा अपक्ष (विजयी)५,१०,९४७. आनंदराव अडसूळ शिवसेना.४, ७३,९९६. गुणवंत देवपारे वंचित बहुजन आघाडी, ६५,१३५. नोटा-५,१८२.
२०१९ पूर्वीच्या निवडणुकीत कोणाची बाजी? वर्ष विजयी उमेदवार पक्ष, मते , व टक्केवारी.२०१४ आनंदराव अडसूळ शिवसेना ४,६५,३६३.४६/: तसेच२००९ मध्ये आनंदराव अडसूळ शिवसेना, ३,१४,२८६.४३/:तर२००४ अनंतराव गुढे शिवसेना, ४,६५,३६३.४६/:तर२००९ आनंदराव अडसूळ शिवसेना.३, १४,२८६.४३/:तर२००४ अनंतराव गुढे शिवसेना, २,३२,०१६.३३/:तर१९९८, रा.सु. गवई रिपाई, २,३६,४३२.४६/:तर१९९६ अनंत गुडे शिवसेना, २,१२,९८६.४२/:टक्के.

Previous articleसोमेश रेसिडेन्सी भागात दिवसा झालेल्या दारोड्याच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपी जेरबंद
Next articleउंद्री प.दे. येथील पार्वती माता मंदिर येथे मूर्ती स्थापना व कलशारोहण सोहळ्याचे आयोजन.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here