• Home
  • *व्हाँटसअपच्या माध्यमातून जमविले शंभरावर विवाह* *सुभाष ढवळेंचे सामाजिक कार्य नावलौकिकास पात्र,आजपर्यंत जमविले एकशे एकवीस विवाह*

*व्हाँटसअपच्या माध्यमातून जमविले शंभरावर विवाह* *सुभाष ढवळेंचे सामाजिक कार्य नावलौकिकास पात्र,आजपर्यंत जमविले एकशे एकवीस विवाह*

*व्हाँटसअपच्या माध्यमातून जमविले शंभरावर विवाह* *सुभाष ढवळेंचे सामाजिक कार्य नावलौकिकास पात्र,आजपर्यंत जमविले एकशे एकवीस विवाह*
*अहमदनगर,(ब्युरो टिम युवा मराठा न्युज)-* आजकाल लग्न जमविणे हे एक अग्नीदिव्यच ठरलेले असून,मुलांचे लग्न जमविण्यासाठी दलालांची वाढलेली अव्याढव्य मागणी त्यामुळे सारेच जण हतबल झालेले आहेत.आपल्या मुला मुलीचे लग्न कसे होणार?असाच यक्ष प्रश्न सगळ्या आईवडीलांना सध्या सतावत आहे.
मात्र या सगळ्या गोष्टीवर समर्पक पर्याय म्हणून श्रीगोंद्याचे सामाजिक कार्यकर्ते सुभाष अर्जून ढवळे हाळगांवकर यांच्याकडे बघितले जात आहे.त्यांनी आजपर्यत एकशे एकवीस विवाह जमवून त्यांचे लग्न लावून दिलेले आहेत.हे सर्व वधूवर गुण्यागोविंदाने आपआपल्या संसारात नांदत आहेत.सुभाष ढवळे यांचे सामाजिक कार्य अत्यंत मोलाचे व नावलौकिक पात्र असून,त्यांनी ढवळे विवाह संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्रभर अनेक विवाहइच्छूकांचे विवाह हे केवळ व्हाँटसअप ग्रुपच्या माध्यमातून जमविले आहेत.त्यामुळे महाराष्ट्रातल्या विविध भागात त्यांचे सत्कार व सन्मान देखील करण्यात आलेले आहेत.सुभाष ढवळे यांच्या रुपाने आता विवाह इच्छूक मुला मुलीसाठी एक आशेचा किरण व सामाजिक कार्यातला हिरा उपलब्ध झाला असल्याने विवाह इच्छूक मुला मुलीची फसवणूक होण्याची गंभीर घटना मात्र यामुळे टळणार आहे.सुभाष ढवळे यांना संपर्क साधण्यासाठी 9359587117 / 9730608648 किंवा युवा मराठा न्युज चँनलशी 9923362030 या नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले असून लवकरच मालेगाव शहरात नाशिक जिल्ह्यातील विवाह इच्छूक उपवर मुला मुलीसाठी युवा मराठा न्युजच्या माध्यमातून विवाह परिचय मेळाव्याचे आयोजन केले जाणार आहे.

anews Banner

Leave A Comment