• Home
  • *खासदारांच्या हस्ते शेतकऱ्याच्या* *मुलीचा सत्कार*.

*खासदारांच्या हस्ते शेतकऱ्याच्या* *मुलीचा सत्कार*.

*खासदारांच्या हस्ते शेतकऱ्याच्या* *मुलीचा सत्कार*.

_कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा_ _मराठा न्यूज)_

हातकणंगले तालुक्यातील मौजे तासगांव येथील शेतकऱ्याच्या मुलीने दहावीच्या परिक्षेत 95.80% गुण मिळविले बद्दल खासदारानी केला सत्कार .
मौजे.तासगांव येथील श्री अर्जून भिमराव कोकाटे शेतकरी कुटुंबातील
पोटापुरती वडिलोपार्जीत शेती करत करत दोन्ही मुलांना चांगले शिक्षण मिळविण्यासाठी शेतीच्या जोरावर काबाड कष्ट करून संसाराचा गाडा चालवतात.
मुलगी अक्षता अर्जुन कोकाटे . हिचा आज दहावीचा निकाल समजताच वडिलांचा आंनद गगणात मावेना.
पेठ वडगांव येथील आदर्श गुरूकुल विद्यालयात चौथा क्रमांक मिळवून शेतकऱ्याच्या मुलीने गगन भरारी घेतली .
शेतकऱ्याच्या मुलीचे कौतुक करणेसाठी शेतकरी संघटनेचे मा.खासदार राजू शेट्टी यांनी स्वतः घरी जाऊन सत्कार करून शुभेच्छा दिल्या. शेतकरी जसा शेतीत राबतो त्याच प्रमाणे शेतकऱ्यांची मुलं अभ्यासात राबतात हे दाखवून दिले असे खासदार यावेळी म्हणाले .
यावेळी सोसायटीचे चेअरमन शिवाजी पाटील (काका) उपस्थित होते.

anews Banner

Leave A Comment