• Home
  • देगलूरमध्ये आज शिवसेनेचा विविध मागण्यासाठी रास्ता रोको पडला पार

देगलूरमध्ये आज शिवसेनेचा विविध मागण्यासाठी रास्ता रोको पडला पार

आशाताई बच्छाव

IMG-20220805-WA0049.jpg

देगलूर गजानन मारोतिराव शिंदे युवा मराठा न्यूज नेटवर्क                                                         दि.5 ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांचा विविध मागण्यासाठी शिवसेनेचे रास्तारोको आंदोलन – देगलूर — आज दिनांक 5 ऑगस्ट रोजी शिवसेनेच्या वतीने ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा, शेतकरयांना त्वरित आर्थिक मदत देण्यात यावी, पिक विमा मंजूर करण्यात यावा, तीन वर्षांतील पिक कर्ज माफ करण्यात यावे नांदेड जिल्हा संपर्कप्रमुख माश्री बबनराव थोरात साहेब यांच्यावरील राजकीय सुडभावनेने हेतूने प्रेरित होउन दाखल करण्यात आलेला गुन्हा रद्द करण्यात यावा या विविध मागण्यासाठी नविन बसस्थानक येथील हैदराबाद दिल्ली या नॅशनल हायवे वर आज दिनांक 5 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता रास्तारोको आंदोलन करण्यात आले आहे व सकाळी 11 वाजता विश्रामगृहात शिवसेना व युवासेना पदाधिकारी, शिवसैनिक, युवा सैनिक, रास्तारोको आंदोलनात शिवसेना जिल्हाप्रमुख उमेश मुंडे, शिवसेना सह संपर्क प्रमुख मा प्रकाश मारावार हे उपस्थितीत होते,रास्तारोको या बाबतीत अधिक माहिती अशी की नांदेड जिल्हासह देगलूर तालुक्यात खरीप हंगामातील पीक पेरणीनंतर संततधार पावसामुळे खरीप हंगामातील पिके वाया गेले आहेत शेतकरी बांधवांनी यावर्षी सुद्धा उसनवारी करून मोठ्या आशेने महागाई- मोलाचं बियाणे व खते खरेदी करून खरीप हंगामातील सोयाबीन, मुग, उडीद, कापूस या पिकाची मोठ्या प्रमाणात पेरणी केली होती पण पेरणीनंतर संततधार पावसामुळे खरीप हंगामातील पिके वाया गेले आहेत राज्यातील सरकार याकडे दुर्लक्ष करून दिल्लीच्या वा-या करुन मुजरा करण्यास धन्यता मानत आहे अद्याप पर्यंत कोणत्याही प्रकारची मदत जाहीर केली नसुन शिवसेना फोडण्यासाठी भाजपच्या दुर्योधनाची मदतीने प्रयत्न केला जात आहे . गेल्या तीन वर्षांपासून सततच्या ओल्या दुष्काळ व तीन वर्षांपूर्वीचा कोरडा या सततच्या ओल्या व कोरड्या दुष्काळमुळे शेतकऱ्यांची झोप व भुक उडाली आहे त्यामुळे शेतकरी बांधवांना आधार देण्यासाठी शासनाने तातडीने पावले उचलण्याची गरज असुन त्यावर उपाय म्हणून ओला दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत देण्यात यावी, पिक विमा मंजूर करण्यात यावा, तीन वर्षांतील पिक कर्ज माफ करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली असून या मागणीसाठी व शिवसेना नांदेड जिल्हा संपर्कप्रमुख माश्री बबनराव थोरात साहेब यांच्यावर राजकीय दुष्टहेतुने प्रेरीत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यात त्यांना अटकही करण्यात आली आहे हा गुन्हा रद्द करण्यात यावा या मागणीसाठी शिवसेना रस्त्यावर उतरून आंदोलन आज दिनांक 5 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता नविन बसस्थानक येथील हैदराबाद दिल्ली या नॅशनल हायवे वर रास्तारोको आंदोलन करण्यात आला आहे, सर्व शिवसैनिक युवा सैनिक शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

anews Banner

Leave A Comment