• Home
  • शिंदे गटाचे प्रवक्ते दिपक केसरकर यांचा मोठा गौप्यस्फोट

शिंदे गटाचे प्रवक्ते दिपक केसरकर यांचा मोठा गौप्यस्फोट

आशाताई बच्छाव

Screenshot_20220805-210209_Google.jpg

पुणे, हवेली तालुका प्रतिनिधी श्री संजय वाघमारे:   शिंदे सरकारचे प्रवक्ते दीपक केसरकर यांचा मोठा गोप्यस्पोट ! सुरत व गुहाटी ला गेल्यानंतर खरे काय घडले त्या पाठीमागचे सविस्तर शिंदे गटचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी खूप मोठा खुलासा केला आहे. त्यांनी सांगितले उद्धव ठाकरे सोबत आमचे बोलणे झाले असता त्यांनी शिवसेनेसोबत भाजपाची युती व्हावी असे वाटते परंतु शिंदेंना बाजूला ठेवावे लागेल असे मागणी त्यांनी केली. प्राण्यांनी केलेल्या वक्त्याबद्दल भाजपाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबरही बोललो होतो व नाराजी व्यक्त केली होती. राणे यांना भाजपाचे मंत्रिपद मिळाले त्यामुळे ठाकरे नाराज होते. राणेंना मंत्रिपद देऊ नये असे ठाकरेंची मागणी होती. सुशांत सिंह राजपूत या प्रकरणाबद्दल आदित्य ठाकरे यांची बदनामी झाली त्यामुळे शिवसैनिक तसेच आम्ही सर्व नाराज होतो असे केसरकरणे सांगितले. भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी असे सांगितले की आम्ही शिंदेंना बाजूला ठेवून सत्ता स्थापन करू शकत नाही त्यामुळे उद्धव ठाकरे व भाजपाचे मिळते जुळते घेणे अवघड होऊन बसले होते. उद्धव ठाकरे यांच्या या सर्व भूमिकांमुळे आम्हाला सुरत व गुवाहाटी या ठिकाणी जाऊन भाजपा बरोबर सत्ता स्थापन करण्याचं व शिवसेनेचे स्थान टिकवण्याचं काम करावं लागलं. बाळासाहेब ठाकरेंचे विचार व शिवसेनेचे विचार यासाठी आम्ही प्रयत्न करतोय आणि ते करत राहणार. आम्ही अजूनही शिवसेनेचेच आहोत हेही त्यांनी सांगितले. या सर्व प्रकारचे खुलासे शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी केले.

anews Banner

Leave A Comment