• Home
  • देशभरात काँग्रेसचे आंदोलन

देशभरात काँग्रेसचे आंदोलन

आशाताई बच्छाव

Screenshot_20220805-210110_Google.jpg

पुणे, हवेली तालुका प्रतिनिधी श्री संजय वाघमारे: देशभरामध्ये काँग्रेसचे आंदोलन; राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीमध्ये काँग्रेसने आंदोलन केले जंतर-मंतर वरती आंदोलनाची परवानगी मागितली असता त्यांना त्या ठिकाणी देण्यात आली. इतर ठिकाणी दिल्ली पोलिसांनी १४४ कलम लागू केला होता. त्या अंतर्गत आंदोलनाचा भडका उडाल्यामुळे दिल्ली पोलिसांनी राहुल गांधी प्रियंका गांधी नाना पटले इत्यादींना अटक केली. राहुल गांधी म्हणाले आम्हाला कितीही पकडा आम्ही मोदींना घाबरत नाही. महागाई भरमसाठ वाढली, बेरोजगारी खूप प्रमाणामध्ये वाढली, गॅसचे दरही खूप उंचीवर गेले याबाबत या मागण्या पूर्ण करण्यासाठी आम्ही आंदोलन करतोय असे त्यांनी सांगितले. देशांमध्ये जो सत्य बोलतो त्याच्या विरोधात ईडी कारवाई होते असे आरोप त्यांनी मोदी सरकार वरती केले. देशभरामध्ये नागपूर अमरावती नाशिक मुंबई पुणे इत्यादी ठिकाणी काँग्रेस कार्यकर्ते यांनी हे आंदोलन केले व त्यांना तेथील पोलिसांनी धर पकड करण्याचे काम केले.

anews Banner

Leave A Comment