Home Breaking News महिलांच्या टी २० क्रिकेटमध्ये मुली ठरल्या रौप्य पदकाच्या मानकरी

महिलांच्या टी २० क्रिकेटमध्ये मुली ठरल्या रौप्य पदकाच्या मानकरी

149

आशाताई बच्छाव

IMG-20220808-WA0027.jpg

महिलांच्या टी २० क्रिकेटमध्ये मुली ठरल्या रौप्य पदकाच्या मानकरी

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा अंतिम टप्प्यात आली आहे. महिलांच्या टी २० क्रिकेटमध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया अंतिम सामना झाला. या सामन्यात भारतीय संघाचा ९ धावांनी पराभव झाला. तर सुवर्णपदक जिंकून ऑस्ट्रेलियाच्या संघाने ‘प्रथम विजेता’ होण्याचा मान मिळवला आहे. भारतीय संघाला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. लढतीत भारताला २० षटकांमध्ये १६२ धावांचे लक्ष्य मिळाले होते. मात्र, भारतीय संघ १९.३ षटकांमध्ये सर्वबाद १५२ धावा करू शकला.

हा सामना एजबस्टन क्रिकेट स्टेडियमवर आयोजित करण्यात आला होता. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच महिलांच्या टी २० क्रिकेटचा समावेश करण्यात आला होता. ऑस्ट्रेलियाची कर्णधार मेग लॅनिंगने भारताविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता.

भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली नाही. सलामीवीर स्मृती मंधाना सहा तर शफाली वर्मा ११ धावा करून बाद झाल्या. हरमनप्रीत कौरने ४३ चेंडूत ६५ धावांची खेळी केली. तर जेमिमाहने ३३ चेंडूत ३३ धावा केल्या.

Previous articleलांजातील काजळी नदीवरील ब्रिटिशकालीन पुलाला पाणी लागल्याने वाहतूक थांबवली वाहतुकीचे अनेक मार्ग बंद
Next articleमुसळधार पावसाने फुणगूस खाडीपट्टी भागात पुर परिस्थिती; भातशेतीचे नुकसान
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.