Home रत्नागिरी मुसळधार पावसाने फुणगूस खाडीपट्टी भागात पुर परिस्थिती; भातशेतीचे नुकसान

मुसळधार पावसाने फुणगूस खाडीपट्टी भागात पुर परिस्थिती; भातशेतीचे नुकसान

32
0

आशाताई बच्छाव

IMG-20220809-WA0022.jpg

मुसळधार पावसाने फुणगूस खाडीपट्टी भागात पुर परिस्थिती; भातशेतीचे नुकसान                             रत्नागिरी,(सुनील धावडे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज)

दोन दिवस अविश्रांत धो-धो कोसळणाऱ्या पावसामुळे संगमेश्वर तालुक्यातील फुणगूस खाडीतील पाण्याच्या पातळीत वाढ होऊन पुरपरिस्थिती निर्माण झाली होती. खाडी किनाऱ्यालगत असलेल्या भातशेतीलाही पुराच्या पाण्याने गिळंकृत केले होते. बाजारपेठेतही दोन ते तीन फूट पाणी होते. असाच पावसाचा जोर कायम राहिल्यास गतवर्षीच्या महापूराची पुनरावृत्ती होणार की काय अशी भीती खाडीभागवासीयांच्या मनात होती. मात्र पावसाने उसंती घेतल्याने हळू-हळू पुराचे पाणी ओसरू लागले आहे.

दहा ते पंधरा दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा हजेरी लावली ती ढगांचा गडगडाट आणि विजांच्या लखलखासह दोन दिवस अविश्रांत धो-धो बरसण्यास सुरुवात केली. त्यामुळे पावसाच्या पाण्याविना खडखडाट झालेले नदी-नालेही ओसंडून वाहण्याबरोबरच फुणगूस येथील शास्त्री खाडीनेही धोक्याची पातळी ओलांडल्याने सर्वत्र पूर परिस्थिती निर्माण झाली होती. तर फुणगूस येथील जुना बाजारपेठेतही पाणी घुसले होते. तर खाडीभागातील परचुरी, फुणगूस, कोंडये, दवखोल, मांजरे, मेढे तर खाडी पलीकडील डिंगणी, पिरणदवणे आदी गावांमधील खाडीलगत असलेल्या भातशेतीतही पुराचे जाऊन हातातोंडाशी आलेली भात शेती पाण्याखाली होती.

दोन दिवस धो-धो कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यावरून पाणी वाहत होते सर्वत्र जलमय परिस्थितीच एकप्रकारे निर्माण झाली हॊती. असाच पावसाचा जोर कायम राहिल्यास गतवर्षीच्या महापुराची पुनरावृत्ती होणार ही एकच धास्ती लोकांच्या मनात होती. मात्र पावसाने उशिराने का असेना उसंती घेतल्याने व पुराचे पाणी हळू-हळू ओसरू लागल्याने लोकांच्या मनात गतवर्षोच्या महापुराच्या पुनरावृत्तीची भीती दूर झाल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

Previous articleमहिलांच्या टी २० क्रिकेटमध्ये मुली ठरल्या रौप्य पदकाच्या मानकरी
Next articleदेव, घैसास, कीर महाविद्यालयात दोन दिवसीय शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळा
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here