Home Breaking News रिझर्व्ह बँकेचे कर्ज महागले!

रिझर्व्ह बँकेचे कर्ज महागले!

144

आशाताई बच्छाव

Screenshot_20220806-162436_Google.jpg

पुणे, हवेली तालुका प्रतिनिधी श्री संजय वाघमारे: भारतीय रिझर्व बँक पुन्हा एकदा कर्ज माहागल! भारतातील प्रमुख बँक भारतीय रिझर्व बँक यांनी एका वर्षात तिसऱ्यांदा कर्जामध्ये वाढ केली आहे. रेपो रेटमध्ये अर्ध्या टक्क्यांनी वाढ केली आहे म्हणजे कर्ज १.६ टक्क्यांनी वाढले. कारण सांगितलं जाते महागाई, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत वाढावी म्हणून हा प्रयत्न आहे असे भारतीय रिझर्व बँक यांनी सांगितले. असे असले तरीही आता सर्वसामान्यांचे हाल होणार हे नक्की कारण ग्रह कर्जाबरोबर वाहन कर्जामध्येही वाढ होणार आहे. भारतीय रिझर्व बँक ने कर्ज महाग केलं की इतर सर्व बँका शेतकऱ्यांचे व इतर सर्वसाधारण कर्ज धारकांचे कर्ज हे महाग करतात कारण इतर बँकांना सर्व कर्ज भारतीय रिझर्व बँक देते त्यामुळे सर्व बँकांवरती याचा परिणाम होतो. सर्वसामान्य शेतकऱ्यांना व वाहन खरेदी करणाऱ्या तसेच घर विकत घेणाऱ्या नागरिकांसाठी मात्र या कर्जवाढ केल्याने अडचणींना सामोरे जावे लागते. त्यातच महागाई प्रचंड वाढलेली, रोजगारीचे प्रश्न निर्माण झालेत अशा मध्ये पुन्हा एकदा कर्ज वाढ झाली हे त्यांच्यासाठी खूप कठीण आहे.