Home रत्नागिरी शिवसेना उपनेते तथा आमदार डॉ.राजन साळवी यांच्या उपस्थितीत युवासेनेच्या झंझावाताला सुरुवात !

शिवसेना उपनेते तथा आमदार डॉ.राजन साळवी यांच्या उपस्थितीत युवासेनेच्या झंझावाताला सुरुवात !

59
0

आशाताई बच्छाव

IMG-20220806-WA0024.jpg

शिवसेना उपनेते तथा आमदार डॉ.राजन साळवी यांच्या उपस्थितीत युवासेनेच्या झंझावाताला सुरुवात   रत्नागिरी,(सुनील धावडे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

रत्नागिरी तालुक्याच्या तालुका युवाधिकारी पदी प्रसाद सावंत व मुंबई समन्वय अर्थव राजन साळवी तसेच शहर युवाधिकारी पदी आशिष चव्हाण ह्यांची निवड झाल्यानंतर युवासेनेची घोडदौड जोरात चालू झाली असून नुकतेच त्यांच्या पुढाकाराने तालुक्यातील विविध भागातील कॉलेज युवकांनी युवासेना प्रमुख तथा शिवसेना नेते आदित्य ठाकरे ह्यांचा कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून शिवसेना उपनेते तथा राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.राजन साळवी व विधानसभा क्षेत्रप्रमुख प्रमोद शेरे यांच्या उपस्थितीत युवासेनेमध्ये सक्रिय सहभाग जाहीर केला.

या सहभागामध्ये पारस साखरे, धतराज चव्हाण, पारस भाटकर, हितेश बिर्जे, पारस पाटील, तरुण शिवलकर, अरुण जोगी, इरफान मुल्ला, अर्थव चरकरी, वेदांत सागवेकर, ओंकार पाटील, ऋषिकेश ठाकूर, नितीन खोदीया, अमेय गराटे, साहिल तांबट, रोहन सावंत, फराहत मजगावकर, राज कदम, रोहन खेत्री, निखिलेश धनावडे, आयन झारी, आकाश पांचाळ, मंदार पाडाळकर, रितेश गावडे, ओवीस वाघू, सोहम मोहिते, सिद्धेश फणसेकर, गौरव पटेल, वेदांत तांबे, विशाल जैस्वाल, वैभव पांचाळ, मोहल अलजी यांचा समावेश आहे. याप्रसंगी उप जिल्हाप्रमुख संजय साळवी, दुर्गेश दीपक साळवी, प्रसाद पाटणे, निखिल बने आदी मान्यवर उपस्थित होते.

Previous articleआरे’ विरोधात उद्या होणार आंदोलन – प्रकाश आंबेडकरांची घोषणा
Next articleरिझर्व्ह बँकेचे कर्ज महागले!
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here