Home मुंबई आरे’ विरोधात उद्या होणार आंदोलन – प्रकाश आंबेडकरांची घोषणा

आरे’ विरोधात उद्या होणार आंदोलन – प्रकाश आंबेडकरांची घोषणा

45
0

आशाताई बच्छाव

IMG-20220806-WA0029.jpg

‘आरे’ विरोधात उद्या होणार आंदोलन – प्रकाश आंबेडकरांची घोषणा                                           मुंबई,(सुनील धावडे ब्युरो टिम युवा मराठा न्युज नेटवर्क) 

अहमदाबाद-मुंबई मेट्रोचे कारशेड महाविकास आघाडी सरकारने आरे येथून हलवून कांजुरमार्गला हलवले होते. मात्र शिंदे सरकारने गोरेगावमधील आरे जंगलात मेट्रो कारशेड बांधण्याचा घाट घातला आहे. त्याविरोधात आता मुंबई वंचित बहुजन आघाडीच्या वतीने रविवारी आंदोलन करण्यात येणार आहे.

सत्तांतरानंतर शिंदे-फडणवीस सरकारने ठाकरे सरकारचा मुंबईतील मेट्रो ३ कारशेडबाबतचा निर्णय रद्द करत कारशेड कांजुरमार्गहून पुन्हा आरे कॉलनीच्या परिसरातच करण्याचा निर्णय घेतला. शिवसेनेनेसह आरेमधील स्थानिक रहिवाशांनीही याविरोधात विरोधाचा मार्ग निवडला आहे. आता वंचित बहुजन आघाडीनेही आंदोलनाची घोषणा केली आहे. वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी उद्या रविवारी (७ ऑगस्ट) रोजी आरे बचावासाठी आंदोलन करणार असल्याची घोषणा केली आहे.

आरेचं जंगल मुंबईच्या ऑक्सिजनचा मोठा स्रोत आहे. ऑक्सिजन निर्माण करणारं हे जंगल मुंबईकरांचे जीवन आहे, हे संपलं तर मुंबईत राहणंच मुश्किल होईल. म्हणून मुंबईतील वंचित बहुजन आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी रविवारच्या आंदोलनात सहभागी व्हावे, असं आवाहन प्रकाश आंबेडकरांनी केलं आहे.

मेट्रो ३ (कुलाबा-वांद्रे-सीप्झ) मार्गिकेतील आरे कारशेडच्या कामासाठी पुढील सुनावणीपर्यंत आरेतील एकही झाड कापू नये असे निर्देश शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकार आणि मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (एमएमआरसी) ला दिले आहेत. तर याबाबत पुढील सुनावणी १० ऑगस्टला होणार आहे.

Previous articleदुकानातून पैसे गायब करणारे अट्टल चोर जोडपे अटकेत
Next articleशिवसेना उपनेते तथा आमदार डॉ.राजन साळवी यांच्या उपस्थितीत युवासेनेच्या झंझावाताला सुरुवात !
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here