Home बुलढाणा मोताळा तलाठीला तीस हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

मोताळा तलाठीला तीस हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

164
0

आशाताई बच्छाव

IMG_20231208_210813.jpg

युवा मराठा न्यूज मोताळा तालुका प्रतिनिधी संजय पन्हाळकर                                                सरकार कडून स्वच्छ प्रशासनाच्या कितीही बाता हाणल्या जात असल्या तरी काही सरकारी अधिकारी खायचे सोडत नाहीत. ते अधिकारांचा गैरवापर करून सामान्यांना लुटतात. माया जमवतात.. मात्र कधीतरी त्यांच्या पापाचा घडा भरतोच. मोताळा तहसील कार्यालयात तलाठी असलेल्या किशोर कन्हाळेच्या बाबतीतही तेच घडल… त्याला ३० हजार रुपयांची लाच घेतांना अमरावती एसीबी पथकाने रंगेहाथ पकडले..5 डिसेंबरला मोताळा सजा कार्यालयात हा प्रकार घडला..

 

याबाबत वृत्त असे की, मोताळा तालुक्यातील रोहिणखेड येथील ६१ वर्षीय व्यक्तीने त्यांच्या शेतजमिनीच्या हिस्सेवाटणीचे प्रकरण तलाठी किशोर कऱ्हाळे याच्याकडे दाखल केले होते. त्यासाठी कन्हाळे याने ३० हजार रुपयांची लाच मागितली. त्यामुळे सदर शेतकऱ्याने अमरावतीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) याप्रकरणाची तक्रार केली. तक्रारीची सत्यता पडताळणी केल्यानंतर 6 डिसेंबरच्या सायांकाळी सापळा रचून तलाठी कन्हाळे याला रंगेहाथ पकडण्यात आले. त्याच्याविरुद्ध बोराखेडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करुन देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ लाच लुचपत प्रतिबंधक विभागाला संपर्क साधावा.

Previous articleधान उत्पादकांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री थेट बांधावर नागपूर जिल्ह्यातील नुकसानीची पाहणी
Next articleचांदूर बाजार बसस्थानक ते परसोडा फाटा रस्त्याचे बांधकाम तात्काळ पूर्ण करा
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here