Home पुणे गणेश कला क्रीडा केंद्रात आता कोविड हॉस्पिटल…!🛑

गणेश कला क्रीडा केंद्रात आता कोविड हॉस्पिटल…!🛑

99
0

राजेंद्र पाटील राऊत

🛑 गणेश कला क्रीडा केंद्रात आता कोविड हॉस्पिटल…!🛑
✍️ पुणे 🙁 विलास पवार पुणे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

पुणे/स्वारगेट :-⭕ गणेश कला क्रीडा केंद्र याp ठिकाणी सुरू होणाऱ्या कोविड हॉस्पिटलची पाहणी केली.

पुणे शहरातील वाढती रुग्णसंख्या व त्या प्रमाणात ऑक्सिजन बेड्स, व्हेंटिलेटर बेड्सची जाणवणारी कमतरता भरून काढण्यात येत आहे. महापालिकेच्या माध्यमातून शहराच्या विविध भागात असणाऱ्या महापालिका रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांकरता बेड्सची संख्या मोठ्या क्षमतेने वाढवण्यात येत आहे.

गणेश कला क्रीडा मंच ही महानगरपालिकेची वास्तू असून या ठिकाणी डॉ. ऋतुपर्ण शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या संकल्पनेतून व महानगरपालिका, काही स्वयंसेवी संस्था व सामाजिक उत्तरदायित्व निधीच्या माध्यमातून या ठिकाणी १०० ऑक्सिजन बेड्सची व्यवस्था करण्यात येत आहे. यामुळे शहरातील कोरोना रुग्णांना मोठा लाभ होणार आहे.

डॉ. शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी कोरोना काळात घेतलेला मदतीचा निर्णय निश्चितच अभिमानास्पद व स्वागतार्ह आहे.

या ठिकाणी सुरू होणाऱ्या कोविड हॉस्पिटल च्या उभारणीस लागणारी आवश्यक ती सर्व यंत्रणा व साधने महापालिकेच्या माध्यमातून उपलब्ध केली जात आहेत. येणाऱ्या दोन ते तीन दिवसांत टप्प्या-टप्प्याने हे काम पूर्णत्वास जाऊन त्याचे लोकार्पण लवकरच करण्यात येणार आहे.

या कामाच्या पाहणी प्रसंगी आयुक्त विक्रम कुमार, काँग्रेस गटनेते आबा बागुल, नगरसेवक धनराज घोगरे, प्रिया गदादे, अतिरिक्त महापालिका आयुक्त रुबल अग्रवाल, डॉ.ऋतुपर्ण शिंदे, शहर अभियंता प्रशांत वाघमारे, शिवाजी लंक यांच्यासह महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते….⭕

Previous articleसहकार महर्षी स्व.बाजीराव बाळाजी पाटील यांच्या जयंतीचे कार्यक्रम रद्द
Next articleमहाराष्ट्राच्या मदतीला धावले मुकेश अंबानी; गुजरातच्या फॅक्टरीतून १०० मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवठा
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here