Home कोल्हापूर सहकार महर्षी स्व.बाजीराव बाळाजी पाटील यांच्या जयंतीचे कार्यक्रम रद्द

सहकार महर्षी स्व.बाजीराव बाळाजी पाटील यांच्या जयंतीचे कार्यक्रम रद्द

122
0

राजेंद्र पाटील राऊत

सहकार महर्षी स्व.बाजीराव बाळाजी पाटील यांच्या जयंतीचे कार्यक्रम रद्द

वडगांव :  -(मोहन शिंदे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क) ऐतवडे खुर्द ता वाळवा येथील सहकार महर्षी साहित्यप्राज्ञ स्वर्गीय बाजीराव बाळाजी पाटील उर्फ बापूजी यांच्या 87 व्या जयंतीनिमित्त पश्चिम महाराष्ट्र प्रादेशिक सहकार संघाचे अध्यक्ष डॉ प्रताप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खुल्या गटामध्ये विविध स्पर्धा घेण्यात येणार होत्या त्या कोरोणामुळे पुढे ढकलण्यात येणार असल्याची माहिती व्याख्यानमाला समन्वयक प्रा. सुरेश इंगळे यांनी दिली.
साहित्यप्राज्ञ स्व. बाजीराव बाळाजी पाटील यांच्या जयंतीनिमित्त वारणा शिक्षण संकुलाच्या वतीने विविध स्पर्धांचे आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.यावर्षीही वारणा महाविद्यालय व बुद्धी विकास वाचनालय ऐतवडे खुर्द यांच्या संयुक्त विद्यमाने चित्रकला स्पर्धा( लहान गट मध्यम गट मोठा गट ) रांगोळी स्पर्धा, शॉर्ट फिल्म स्पर्धा अश्या विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. शॉर्ट फिल्म स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून बावीस स्पर्धकांनी आपल्या शॉर्टफिल्म ची नोंदणी केली आहे.तर रांगोळी आणि चित्रकला स्पर्धेसाठी हि अनेक स्पर्धकांनी स्पर्धा समितीकडे आपल्या नावांची नोंद केलेली आहे. चित्रकला स्पर्धा या स्पॉट चित्रकला अंतर्गत संपन्न होणार होत्या परंतु कोरोना आणि लॉक डाऊनच्या समस्येमुळे सदरच्या स्पर्धा या पुढे ढकलण्यात आल्या आहेत. स्पर्धेच्या तारखा नंतर कळविण्यात येणार असल्याची माहिती सहसमन्वयक डॉ. सुरज चौगुले यांनी यावेळी दिली.

Previous articleवडगांवात विनाकारण फिरणाऱ्यावर कारवाई
Next articleगणेश कला क्रीडा केंद्रात आता कोविड हॉस्पिटल…!🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here