Home कोल्हापूर वडगांवात विनाकारण फिरणाऱ्यावर कारवाई

वडगांवात विनाकारण फिरणाऱ्यावर कारवाई

119
0

राजेंद्र पाटील राऊत

वडगांवात विनाकारण फिरणाऱ्यावर कारवाई

पेठ वडगांव : (मोहन शिंदे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क) संपूर्ण राज्यासह कोल्हापूर जिल्ह्यातील पेठ वडगांव शहरात देखील कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेत कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यासह वडगांव शहरात देखील वीकेण्ड लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक श्री.संतोष घोळवे यांनी विकेंड लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी सुरू आहे , तसेच विनाकारण बाहेर फिरण्याऱ्यावर कठोर व दंडात्मक कारवाई करणार असल्याचेही सांगितले आहे. याच अनुषंगाने आज शहरात विनाकारण बाहेर फिरणाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात येत आहे. याशिवाय जे दुचाकीस्वार विनाकारण बाहेर पडतात त्यां सर्वांची वायफळ कारणे दवाखान्यात चाललोय असेच सांगत आहेत. जिल्ह्यासह वडगांव मध्ये देखील कोरोना रुग्णसंख्या प्रचंड वाढ झाली आहे. कोरोनाची ही साखळी तोडण्यासाठी ‘ब्रेक द चैन’ मिशन अंतर्गत राज्यात गेल्या आठवड्यात मिनी लॉकडाऊन जाहीर केलं होतं.
त्यानंतर विकेंडला म्हणजेच शनिवारी-रविवारी कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आले होते.
वडगांव शहरात आज शनिवारी कारवाई नंतर शुकशुकाट पाहायला मिळाला आहे. परंतु जे लोक विनाकारण, विना मास्क बाहेर फिरत होते त्यांच्यावर ही कठोर कारवाई करण्यात आली आहे.

Previous articleशिवसेना मालेगांवतर्फे गोर-गरीब बांधवांना घरपोच शिवभोजनाचे वाटप
Next articleसहकार महर्षी स्व.बाजीराव बाळाजी पाटील यांच्या जयंतीचे कार्यक्रम रद्द
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here