• Home
  • *रायगड जिल्ह्यात पाच मजली इमारत कोसळली*

*रायगड जिल्ह्यात पाच मजली इमारत कोसळली*

*रायगड जिल्ह्यात पाच मजली इमारत कोसळली*

*कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा मराठा न्युज )*

रायगड जिल्ह्यातील मुंबई गोवा हायवे लगत असलेले महाड तालुक्यातील साळीवाडा नाका येथील हापूस तलावाजवळील पाच मजली इमारत कोसळली. महाड शहरातील काजळपुरा परिसरात निवासी इमारत पत्त्यासारखी कोसळली आहे. ही दुर्घटना काल संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास घडली आहे. घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरु आहे. इमारतीचा ढिगारा हटवण्याचे जेसीबी च्या सहाय्याने सुरु आहे.
इमारतीच्या ढिगाऱ्याखाली सुमारे २०० रहिवासी अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. स्थानिक नागरिकांनी तातडीने बचावकार्य सुरु केले असून माणगावहून मदत यंत्रणा रात्री पोहोचली, तर पुण्याहून एनडीआरएफची तीन पथकेही मदतकार्यात गुंतली आहेत. ढिगाऱ्याखालून एकाची जिवंत सुटका करण्यात आली, तर दोन मृतदेह बाहेर काढण्यात आले. तीसजण जखमी झाले असून त्यांना विविध रुग्णालयांमध्ये दाखल केले आहे. रात्री उशिरापर्यंत हे बचावकार्य सुरू होते. कोसळलेल्या ढिगाऱ्याभोवती सुरू असलेल्या आप्त आणि नातेवाईकांच्या किंकाळ्या आणि आक्रोशाने अवघे महाड हादरून गेले.२०११ साली बांधलेल्या या इमारतीचे पिलर्स काही ठिकाणी तुटून ते कमकुवत झाले होते अशी माहिती काही स्थानिक रहिवाशांनी दिली.
सरकारने मृत व्यक्तीना चार लाखांची मदत जाहीर केली तर जखमींना पंचवीस हजार ते एक लाख पर्यंत तातडीने मदत जाहीर केली .

anews Banner

Leave A Comment