*माणगांव मधे मोफत अद्ययावत कोविड सेंटर उद्यापासुन सुरू.*
*कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा मराठा न्युज )*
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये व हातकणंगले तालुक्या मध्ये कोरोना रुग्णांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.रुग्णांना ऑक्सिजन बेड उपलब्ध होणे दुर्लभ झाले आहे.त्यामुळे अनेक रुग्णांना प्राण गमवावे लागले आहेत.माननीय जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर व आपल्या जिल्ह्यातील सर्वच शासकीय अधिकारी डॉक्टर हे रात्र आणि दिवस रूग्णांना उपचार देण्यासाठी व कोरोणा चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रारात्रंदिवस झटत आहेत, याच पार्श्वभूमीवर माणगाव, रूकडी साजणी तिळवणी रुई पट्टणकोडोली माणगांववाडी या गावातील व तसेच ज्यांना बेड उपलब्ध होत नसतील असे सर्वच रुग्णांच्या साठी
आमदार प्रकाश आवाडे यांच्या सूचनेनुसार व जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे व सौ वंदना मगदूम यांच्या सहकार्याने वैष्णवी चॅरिटेबल ट्रस्ट, माणगाव ग्रामपंचायत ,व प्रशांत गवळी अरविंद कुगे व डॉक्टर मेडिकल असोसिएशन माणगाव यांचे मार्फत तोतला टेक्स्टाईल समोर प्रशांत गवळी यांच्या शेड मधे ५० बेड चे मोफत अद्यावत कोवीड सेंटर चे उदघाटन उद्या होणार आहे.
गरजू रुग्णांनी लाभ घेण्याचे आवाहन वैष्णवी चँरीटेबल ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.
ह्या कोविड सेंटरचे संयोजक
वैष्णवी चॅरीटेबल ट्रस्ट
माणगांव ग्रामपंचायत ,
डॉक्टर मेडिकल असोसिएशन माणगाव ,प्रशांत गवळी,अरविंद कूगे
माणगाव .
