• Home
  • *अजमीर सौंदाणेत ग्रंथालय कार्यक्रम संपन्न*

*अजमीर सौंदाणेत ग्रंथालय कार्यक्रम संपन्न*

*अजमीर सौंदाणेत ग्रंथालय कार्यक्रम संपन्न* सटाणा,( जगदीश बधान तालुका ग्रामीण प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)-
काल दिनांक 24 ऑगस्ट 2020 सोमवार रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अजमीर सौंदाणे तालुका बागलाण जिल्हा नाशिक येथे *आदरणीय केंद्रप्रमुख काकळीज आबा यांच्या उपस्थितीत “डोनेट डिवाइस” आणि “डोनेट अ बुक”* उपक्रमांतर्गत ग्रंथालय निर्मिती कार्यक्रम पार पडला. या प्रसंगी आदरणीय केंद्रप्रमुख काकळीज अाबासाहेबांनी पाच पुस्तके डोनेट बुक अंतर्गत भेट दिली. त्याचप्रमाणे शाळेतील मुख्याध्यापक श्री दादाजी पगारे यांनी १५पुस्तके,तसेच विधाते सर ,भामरे सर ,देवरे मॅडम, सूर्यवंशी मॅडम, कापडणीस मॅडम, रौंदळ मॅडम, देवरे मॅडम सोनवणे मॅडम व पवार मॅडम यांच्याकडून देखील ग्रंथालयासाठी पुस्तके भेट देण्यात आली .

त्याच प्रमाणे *डोनेट डिवाइस* अंतर्गत *श्री पाटोळे अजमीर सौंदाणे (शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती नाशिक) यांचे कडून एलईडी टीव्ही भेट देण्यात आला*
याप्रसंगी केंद्रप्रमुख आबांनी शाळा बंद पण शिक्षण सुरु, उपक्रमअध्ययन-अध्यापन ,गृह भेट पालक-विद्यार्थी सुसंवाद, शाळेचे कामकाज यांची पाहणी केली. व शाळेचे कामकाज पाहून समाधान व्यक्त केले.यावेळी शालेय व्यवस्था पण समिति अध्यक्ष जगदिश बधान, उपाध्यक्ष ,व समिति सदस्य तसेच ए एन एम सोनवणे सिस्टर,आशा वर्कर नीलिमा बधान, चित्रा अमृते, कविता सूर्यवंशी, अरूणा पगारे,चित्रा जगताप ,व सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.

anews Banner

Leave A Comment