Home अमरावती चांदूर बाजार बसस्थानक ते परसोडा फाटा रस्त्याचे बांधकाम तात्काळ पूर्ण करा

चांदूर बाजार बसस्थानक ते परसोडा फाटा रस्त्याचे बांधकाम तात्काळ पूर्ण करा

95
0

आशाताई बच्छाव

IMG_20231208_211447.jpg

चांदूर बाजार बसस्थानक ते परसोडा फाटा रस्त्याचे बांधकाम तात्काळ पूर्ण करा

भाजपा माजी नगरसेवक गोपाल तिरमारे यांची मागणी

चांदूरबाजार,(मयुर खापरे प्रतिनिधी)-

चांदुर बाजार बस स्थानक ते परसोडा फाटा रूंदीकरण करण्याचे बांधकाम संथ गतीने सुरु असून तात्काळ रखडले बांधकाम पूर्ण करण्याची मागणी भाजपा नेते गोपाल तीरमारे यांनी सार्वजनिक बांधकाम चांदूर बाजार उपविभागिय अभियंता मिलिंद बेंडे यांना निवेदन देऊन करण्यात आली चांदुर बाजार अंतर्गत येत असलेल्या चांदूर बाजार बस स्थानक ते परसोडा फाटा या रस्त्याचे रुंदीकरणाचे काम गेल्या २ वर्षांपासून सुरु असून रस्त्याचे काम अत्यंत संथ गतीने सुरु आहे रस्त्यावर अनेक अपघात होवून जीवित हानी सुद्धा झाली आहे‌‌ तर रस्त्याचे काम अत्यंत निष्कृष्ट दर्जाचे झाले असून त्याबाबत अनेकांच्या तक्रारी सुद्धा प्राप्त झालेल्या आहेत‌ रस्त्याचे काम अत्यंत संथ गतीने सुरु असल्याने त्या ठिकाणी अपघाताचे प्रमाण वाढले असून सुद्धा सार्वजनिक बांधकाम विभाग या विषयाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याच निदर्शनास येत असल्याच तिरमारे यांनी निवेदनामध्ये नमुद केले अपघातासाठी कारणीभूत असलेल्या चांदूर बाजार बस स्थानक ते परसोडा फाटा रस्त्याचे रखडलेले बांधकाम तात्काळ पूर्ण करूण रस्त्याच्या कामास दिरंगाई होवून झालेल्या जीवित हानीस जबाबदार असलेल्या कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई करण्यात यावी अन्यथा नाईलाजाने आंदोलनात्मक पवित्रा घ्यावा लागेल असा ईशारा यावेळी भाजपा नेते गोपाल तीरमारे यांनी बांधकाम विभागाला दिला.

 

सार्वजनिक बांधकाम विभाग कुंभकर्ण झोपेत

चांदूरबाजार ते परसोडा फाटा पर्यंत रुंदीकरणाचे बांधकाम गेल्या अनेक दिवसांपासून बंद असून येजा करणाऱ्या वाहन चालकांना त्रास सहन करावा लागत आहे तर गेल्या काही दिवसा अगोदर अपघातही या रस्त्यावर झाला असून सार्वजनिक विभाग कुंभकर्णी झोपेत असल्याचे चित्र दिसत आहे.

Previous articleमोताळा तलाठीला तीस हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले
Next articleजिव्हाळा मिञ परीवार व महामानव गृप च्या वतिने संग्रामपुर येथे रक्तदान शिबिर संपन्न
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here