Home कोल्हापूर दुकानातून पैसे गायब करणारे अट्टल चोर जोडपे अटकेत

दुकानातून पैसे गायब करणारे अट्टल चोर जोडपे अटकेत

65
0

आशाताई बच्छाव

IMG-20220806-WA0027.jpg

दुकानातून पैसे गायब करणारे अट्टल चोर जोडपे अटकेत                                                            कोल्हापूर,(सुनील धावडे ब्युरो टिम युवा मराठा न्युज नेटवर्क)

कोल्हापूरातील मार्केट यार्ड, येथील धनश्री ट्रेडर्स अँड कमिशन एजंट या दुकानात रवींद्र पंडित सनगर हे दिवाण म्हणून काम पाहत होते. दि.३०/६/२०२२ रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास एक महिला दुकानात आली. मला पैशाची गरज आहे असे सांगत तिने स्वतःकडील मोबाईल विकायचा आहे असे सांगितले. सनगर यांनी मोबाईलची पाहणी केली व फोन नादुरुस्त आहे असे त्या महिलेस सांगितले. महिलेने माझे पती बाहेर आहेत त्यांना फोन दाखवा असे सांगितले. सनगर जेव्हा त्या महिलेच्या पतीला फोन दाखवायला गेले तेव्हा त्या महिलेने पैशाच्या ड्रॉवरमधून १लाख ३९ हजार काढून घेऊन पळ काढला. दिवाणजी दुकानात आल्यावर त्यांना ड्रॉवर उघडा असल्याचे लक्षात आले. त्या ड्रॉवरमधील रोख रक्कम चोरी झाल्याचे दिवाणजीच्या लक्षात आले. या चोरी बद्दलची तक्रार त्यांनी शाहूपुरी पोलीस ठाणे येथे केली.

शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. आसपासच्या भागात सीसीटीव्ही नसल्याने शोध मोहिमेत अडचणी येत होत्या. त्या दरम्यान गोपनीय माहिती पथकास मिळाली की, राजेंद्र नगर येथे भाड्याने राहणाऱ्या एका जोडप्याने ही चोरी केली असावी व हे जोडपे गुन्हा घडलेल्या वेळेपासून फरार आहे.

दि.२ ऑगस्ट रोजी शोध पथकास खात्रीशीर माहिती मिळाली की, हे जोडपे मध्यवर्ती बसस्थानक येथून गोव्याला जाणार आहे. गुन्हे शोध पथकाने मध्यवर्ती बसस्थानक येथे सापळा रचला असता सदर जोडपे दिसले.बत्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी आपले नाव १) निता अभिषेक महाडिक उर्फ बन्नी शेख वय २२, २) अभिषेक दिपक महाडिक वय २४ (दोघे राहणार राजेंद्र नगर) असे सांगितले. अधिक चौकशी केली असता त्यांनी मार्केट यार्ड येथील एका दुकानात चोरी केल्याचे कबुली दिली. त्यांच्याकडून रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.

सदरची कारवाई शाहूपुरी पोलिस ठाण्यातील सहा.पोलिस निरीक्षक श्रीकांत इंगवले, ऋषिकेश पवार, युवराज पाटील, मिलिंद बांगर, शुभम संकपाळ, लखन पाटील, सागर माने, राहुल कांबळे, शिल्पा आडके यांनी केली आहे.

Previous articleमुखेड महावितरणाच्या भोंगळ कारभाराविरोधात जनाआक्रोश
Next articleआरे’ विरोधात उद्या होणार आंदोलन – प्रकाश आंबेडकरांची घोषणा
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here