Home Breaking News 🛑 आता ३० खाटा असलेल्या रुग्णालयातही कोरोना रुग्णांवर उपचार…! 🛑 ✍️पुणे :(...

🛑 आता ३० खाटा असलेल्या रुग्णालयातही कोरोना रुग्णांवर उपचार…! 🛑 ✍️पुणे :( विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

97
0

🛑 आता ३० खाटा असलेल्या रुग्णालयातही कोरोना रुग्णांवर उपचार…! 🛑
✍️पुणे 🙁 विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

पुणे :⭕ राज्य सरकारच्या आदेशानुसार शहरातील मध्यम स्वरुपाच्या 30 खाटांची क्षमता असलेल्या रुग्णालयांना कोरोनाचे रुग्ण दाखल करुन घेण्याचा सुचना महापालिका प्रशासनाकडुन देण्यात?आल्या आहेत. शहरात मध्यम स्वरुपाची अनेक रुग्णालये आहेत.

अशा 30 हून अधिक रुग्णालयात कोविड 19 रूग्णांवर उपचार करण्याबाबतच्या सूचना महापालिकेकडून देण्यात आल्या आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यावर प्रारंभी शहरातील 18 मोठे रुग्णालयांच्या खाटा पहिल्या टप्प्यात महापालिकेने आरक्षित करून तेथे कोरोनाच्या रूग्णांवर उपचार करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

या 18 खाजगी रुग्णालयामध्ये 322 आयसीयू बेड, 177 व्हेटिलेटर खाटा, 1 हजार 242 ऑक्सिजन खाटा व 2 हजार 486 सर्वसामान्य खाटा उपलब्ध आहेत़. परंतु, वाढती कोरोनाबाधितांची संख्या लक्षात घेता खाटांची कमतरता पडू नये म्हणून महापालिका यंत्रणेने आता शहरातील 30 खाटांची क्षमता असलेल्या रुग्णालयालाही कोरोनाच्या रूग्णांवर उपचार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार शहरातील 30 रुग्णलयांना याबाबतचे आदेश देण्यात आले आहेत़…⭕

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here