• Home
  • 🛑 भरमसाठ वीज बिल आलंय?; अदानी एनर्जीने घेतला ग्राहकांसाठी ‘हा’ मोठा निर्णय 🛑 मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

🛑 भरमसाठ वीज बिल आलंय?; अदानी एनर्जीने घेतला ग्राहकांसाठी ‘हा’ मोठा निर्णय 🛑 मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

🛑 भरमसाठ वीज बिल आलंय?; अदानी एनर्जीने घेतला ग्राहकांसाठी ‘हा’ मोठा निर्णय 🛑
मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई, 10 जुलै : ⭕ भरमसाठ वीज बिल आलेल्या वीज ग्राहकांसाठी अदानी एनर्जी मुंबई लिमिटेडने (adani energy mumbai limited ) महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ग्राहकांच्या (consumers ) जूनच्या बिलाववर कुठलेही व्याज न आकारण्याचा आणि तीन हप्त्यात बिल भरणाऱ्यांवर कुठलेही विलंब शुल्क न लावण्याचा निर्णय अदानी एनर्जीने घेतला आहे. त्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर वीज वितरण कंपन्यांकडून अव्वाच्या सव्वा बिल आल्याने ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. त्यामुळे ठिकठिकाणी आंदोलनं होत असतानाच अदानी एनर्जी मुंबई लिमिटेडने महत्वाचा निर्णय घेतला आहे. ग्राहकांच्या जूनच्या बिलाववर कुठलेही व्याज न आकारण्याचा आणि तीन हप्त्यात बिल भरणाऱ्यांवर कुठलेही विलंब शुल्क न लावण्याचा निर्णय अदानी एनर्जीने घेतला आहे. त्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.⭕

anews Banner

Leave A Comment