Home Breaking News 🛑 ATKT च्या विद्यार्थ्यांसाठी ठरला पासिंग फॉर्म्युला 🛑 मुंबई ( साईप्रजित मोरे...

🛑 ATKT च्या विद्यार्थ्यांसाठी ठरला पासिंग फॉर्म्युला 🛑 मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

156
0

🛑 ATKT च्या विद्यार्थ्यांसाठी ठरला पासिंग फॉर्म्युला 🛑
मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई, 10 जुलै : ⭕ ATKT Formula: राज्यात पदवी परीक्षा होणार की नाही यावरून गोंधळ सुरू असतानाच एटीकेटीच्या (अलाऊड टू कीट टर्म) विद्यार्थ्यांचं काय हा प्रश्नही कायम होता. मात्र आता राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभाग एटीकेटी असलेल्या विद्यार्थ्यांसंदर्भात लवकरच निर्णय जाहीर करणार आहे. एटीकेटीच्या विद्यार्थ्यांना अन्य विद्यार्थ्यांप्रमाणेच सरासरीचा फॉर्म्युला वापरत उत्तीर्ण करावे, अशी शिफारस कुलगुरुंच्या समितीने राज्य सरकारला केली आहे. ही शिफारस येत्या दोन दिवसांत मंजूर होण्याची शक्यता आहे.

मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखालील समिती राज्यातील परीक्षांसंदर्भातील शिफारशी करण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागाने नेमली आहे. या समितीची शनिवारी ४ जुलै रोजी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक झाली. त्यात पेडणेकर यांनी एटीकेटीच्या विद्यार्थ्यांसंदर्भातील ही शिफारस मांडली. या विद्यार्थ्यांनादेखील त्या-त्या विषयांमध्ये अंतर्गत मूल्यमापन तसेच आधीच्या एकूणच कामगिरीच्या आधारे गुण द्यावेत. जर विद्यार्थ्याला एखाद्या विषयात उत्तीर्णतेसाठी गुण कमी पडत असतील तर त्याला ग्रेस मार्क द्यावेत, अशी शिफारस कुलगुरुंच्या समितीने केली आहे. यासह अन्य केटी नसलेल्या सर्वच विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करून पदवीदान होईल. ज्या विद्यार्थ्यांना श्रेणीसुधार करायची असेल त्यांनी नंतर परिस्थिती सामान्य झाल्यावर परीक्षा द्यावी, अशी शिफारसही या समितीने केली आहे. या दोन अंशत: दुरुस्ती परीक्षेसंदर्भातील जीआरमध्ये कराव्यात अशी शिफारस समितीने उच्च व तंत्र शिक्षण विभागाला केली आहे.

राज्यात पदवी अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाला एकूण सुमारे ९ लाख विद्यार्थी आहेत, त्यांपैकी सुमारे एक तृतीयांश विद्यार्थ्यांना एका किंवा अधिक विषयांमध्ये केटी आहे. मुंबई विद्यापीठात पदवीच्या अंतिम वर्षाला २ लाख तीन हजार विद्यार्थी आहेत, त्यापैकी ७३ हजार विद्यार्थ्यांना एटीकेटी आहे. या सर्व विद्यार्थ्यांना कुलगुरुंच्या समितीची ही शिफारस मंजूर झाल्यास खूप मोठा दिलासा मिळणार आहे.⭕

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here