Home माझं गाव माझं गा-हाणं 🛑 ❗केशरी शिधापत्रिका❗ धारकांना…! राज्य सरकारचा मोठा निर्णय 🛑 ✍️महत्त्वाची बातमी :(...

🛑 ❗केशरी शिधापत्रिका❗ धारकांना…! राज्य सरकारचा मोठा निर्णय 🛑 ✍️महत्त्वाची बातमी :( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

98
0

🛑 ❗केशरी शिधापत्रिका❗ धारकांना…! राज्य सरकारचा मोठा निर्णय 🛑
✍️महत्त्वाची बातमी 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

विशेष बातमी :⭕कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत समाविष्ट होऊ न शकलेल्या एपीएल (केशरी) शिधापत्रिकाधारकांना जुलै व ऑगस्ट या दोन महिन्यांकरीता सवलतीच्या दराने अन्नधान्याचा लाभ देण्याचा आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला.

कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर एपीएल (केशरी) मधील राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेत व शेतकरी योजनेत समाविष्ट नसलेल्या शिधापत्रिकाधारकांना प्रतिव्यक्ती 3 किलो गहू 8 रुपये प्रति किलो व 2 किलो तांदूळ 12 रुपये प्रति किलो याप्रमाणे 5 किलो अन्नधान्य मे व जून या 2 महिन्यात दिले आहे. त्याच धर्तीवर जुलै व ऑगस्ट या दोन महिन्यांच्या कालावधीकरिता त्याच परिमाणात व त्याच दराने अन्नधान्य देण्यात येत आहे.

त्याकरीता आवश्यक असलेल्या 28 कोटी रुपये एवढा अतिरिक्त निधी उपलब्ध करुन देण्यास मान्यता देण्यात येत आहे. केंद्र शासनाकडे गहू प्रतिकिलो 21 रुपये व तांदूळ प्रतिकिलो 22 रुपये या दराने मागणी करण्यास मान्यता देण्यात येत आहे…⭕

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here