Home माझं गाव माझं गा-हाणं व्यापारी बांधवांचा “कोव्हीड योद्धा” म्हणून आमदार भिमराव तापकीर यांच्याकडून गौरव…! 🛑 ✍️पुणे...

व्यापारी बांधवांचा “कोव्हीड योद्धा” म्हणून आमदार भिमराव तापकीर यांच्याकडून गौरव…! 🛑 ✍️पुणे :( विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

63
0

व्यापारी बांधवांचा “कोव्हीड योद्धा” म्हणून आमदार भिमराव तापकीर यांच्याकडून गौरव…! 🛑
✍️पुणे 🙁 विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

धनकवडी/पुणे:⭕कोरोना महामारी विरुध्दच्या कठीण लढाईमध्ये डाॅक्टर, पॅरामेडीकल स्टाफ, पोलीस अधिकारी व कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, शासकीय कर्मचारी, सामाजिक संस्था, सार्वजनिक मंडळे, सामाजिक कार्यकर्ते यांच्याबरोबरीने व्यापारी बांधव जसे किराणा दुकानदार, स्वस्त धान्य दुकानदार, मेडिकल दुकानदार, भाजी विक्रेते यांनी जनसामान्यांना अविरतपणे अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा हा आपले आरोग्य धोक्यात घालून आजपर्यंत चालू ठेवलेला आहे. त्यामुळे जनसामान्य माणूस कधीही उपाशी पोटी झोपला नाही.

परंतू इतर सर्व घटकांना “कोव्हीड योद्धा” गौरव करत असताना, आपला पडद्या मागील “कोव्हीड योद्धा” असलेला व्यापारी बांधव याचा देखील गौरव झाला पाहिजे, त्यांच्या कार्याची दखल घेतली पाहिजे हे खडकवासला विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार मा. भिमराव (आण्णा) तापकीर यांच्या लक्षात आल्यानंतर त्वरीत त्यांनी भारतीय जनता पार्टी – खडकवासला मतदार संघ व्यापारी आघाडी च्या माध्यमातून आज या पडद्या मागील “कोव्हीड योध्द्यांचा” सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

यामध्ये धनकवडी, बालाजीनगर, भारती विद्यापीठ परिसराततील व्यापारी बांधव सर्व माननीय बाबा पंडित, अरुणशेठ अडागळे, पांडुरंग पिलाने, घनश्याम उणेचा, धनपत उणेचा, रूपचंद डांगी, नारायण चौधरी, प्रवीण चौधरी, खुशाल उणेचा, सचिन शेवते, राकेश उणेचा, मोहन चौधरी व गणेश डाबी यांचा सन्मानपत्र, शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

आमदार मा. भिमराव (आण्णा) तापकीर यांनी मनोगत व्यक्त करताना व्यापारी बांधवांच्या कामाचे कौतुक केले व संपूर्ण खडकवासला मतदार संघातील “कोव्हीड योध्द्यांचा” सन्मान आपण करणार असल्याचे सांगितले. तसेच व्यापारी बांधवांच्या समस्या सोडविण्यासाठी सहकार्य करण्याची ग्वाही दिली. याचबरोबर भाजपा व्यापारी आघाडी अध्यक्ष राजुशेठ डांगी व धनकवडी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष महेश खोपडे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी धनकवडी व्यापारी संघटनचे अध्यक्ष मा महेश खोपडे, भाजपा युवा नेते मा. अभिषेकदादा तापकीर, मा. महेश (आबा) भोसले, सचिनदादा बदक हे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे नियोजन भारतीय जनता पार्टी – खडकवासला मतदार संघ व्यापारी आघाडीच्या वतीने अध्यक्ष मा. राजुशेठ डांगी यांनी केले होते….⭕

Previous article🛑 संभाजीराजे मंत्र्यांपेक्षा मोठे नाहीत…! गुणरत्न सदावर्ते ❗🛑 ✍️मुंबई :( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )
Next article🛑 ❗केशरी शिधापत्रिका❗ धारकांना…! राज्य सरकारचा मोठा निर्णय 🛑 ✍️महत्त्वाची बातमी :( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here