Home Breaking News 🛑 ❗आनंदाची बातमी❗कोरोनावरील आणखी एक औषध लवकरच बाजारात, जाणून घ्या किंमत 🛑...

🛑 ❗आनंदाची बातमी❗कोरोनावरील आणखी एक औषध लवकरच बाजारात, जाणून घ्या किंमत 🛑 ✍️नवी दिल्ली :( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

103
0

🛑 ❗आनंदाची बातमी❗कोरोनावरील आणखी एक औषध लवकरच बाजारात, जाणून घ्या किंमत 🛑
✍️नवी दिल्ली 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

नवी दिल्ली :⭕ कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिव वाढत आहे. देशातील एकूण रुग्णांची संख्या वाढून ७१९६६५ झाली आहे. आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या २०१६० आहे. या कोरोना विषाणूवर उपचार करण्यासाठी आणखी एक औषध बाजारात येत आहे. प्रसिद्ध फार्मा कंपनी ‘सिप्ला’ला रेमडेसिवीर तयार आणि विक्री करण्याची परवानगीही देण्यात आली होती.

हेटरोने आपले औषध लाँच केले आहे. तसेच, आता येत्या एक-दोन दिवसात आपले औषध बाजारात आणले जाईल, असे सिप्लाने जाहीर केले आहे. रेमडेसिवीरच्या या जेनेरिक व्हर्जनचे नाव सिप्रेमी (Cipremi) आहे. एका मुलाखती दरम्यान कंपनीने सांगितले की, औषधाची पहिली बॅचही तयार आहे.सिप्लाच्या सीएफओच्या मते, हे औषध एक किंवा दोन दिवसात सुरू होणार आहे. मात्र, सध्या किती डोस तयार आहेत याबद्दल त्यांनी काहीही सांगितले नाही. अहवालानुसार, सिप्ला Cipremi नावाने औषध सुमारे ४ हजार रुपये प्रति वॉयलच्या दराने विकले जाईल. म्हणजेच हेटरो ग्रुपपेक्षा ते १४०० रुपयांनी स्वस्त असेल. सिप्लाने मुंबईतील बीडीआर फार्माकडून मॅन्युफॅक्चरिंगचा करार केला असून त्या बदल्यात बीडीआर फार्माने तयार डोस आणि पॅकेजिंगसाठी सॉवरेन फार्माशी करार केला.कोरोना रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ पाहता भारतामध्ये या औषधाचे उत्पादन वेगाने वाढवण्याची गरज आहे. सध्या कोरोनाचे २५९५५७ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. अशा स्थितीत औषधांचा काळेबाजार झाल्याचे वृत्त आहे. बर्याच ठिकाणी रेमडेसिवीरच्या एका वॉयलसाठी रूग्णांना 30 हजार ते 40 हजार रुपये मोजावे लागल्याचे दिसून आले.

आरोग्य मंत्रालयाच्या नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार, रेमडेसिवीरचा डोस रूग्णांना सहा दिवसांऐवजी पाच दिवस दिला जाईल. ‘क्लिनिकल मॅनेजमेंट प्रोटोकॉल फॉर कोविड -१९’ च्या नुसार पहिल्या दिवशी, कोरोना रूग्णाला इंजेक्शनच्या रूपात रेमडेसिवीरचे २०० एमजी डोस देणे आवश्यक असते. यानंतर, पुढील चार दिवस दररोज १००-१०० एमजी इंजेक्शन्स आवश्यक आहेत.

ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (डीजीसीआय) कडून मान्यता मिळाल्यानंतर हेटरो ग्रुपने Covifor नावाने औषधांची निर्मिती व विक्री सुरू केली आहे. आतापर्यंत केवळ त्यांचीच औषधे पुरविली जात आहेत. कंपनीने एका वॉयलची किंमत ५४०० रुपये ठेवली आहे. आतापर्यंत केवळ 20 हजार वॉयलचा पुरवठा केला आहे. सिप्लाच्या या घोषणेमुळे रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. कारण रेमडेसिवीरची मागणी वाढत आहे. हे औषध मध्यम ते अत्यवस्थ कोविड -१९ रुग्णांच्या उपचारासाठी मंजूर केले गेले आहे….⭕

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here