Home देश विदेश 9 महिन्यांची गर्भवती, तरीही हरिका द्रोणावल्लीने बुद्धिबळ स्पर्धेत जिंकल कांस्य पदक

9 महिन्यांची गर्भवती, तरीही हरिका द्रोणावल्लीने बुद्धिबळ स्पर्धेत जिंकल कांस्य पदक

74
0

आशाताई बच्छाव

IMG-20220811-WA0036.jpg

9 महिन्यांची गर्भवती, तरीही हरिका द्रोणावल्लीने बुद्धिबळ स्पर्धेत जिंकल कांस्य पदक                       चेन्नई,(युवा मराठा न्युज नेटवर्क)

बुद्धिबळ ऑलिम्पियाड 2022 स्पर्धेत भारताच्या महिलांनी कांस्य पदक मिळवलं. दरम्यान यावेळी संघातील खेळाडूंमध्ये ग्रँडमास्टर हरिका द्रोणावल्ली ही देखील होती. नऊ महिन्यांची गर्भवली असताना हरिकाने संघासाठी खेळत भारताला पदक मिळवून देण्यात मोलाची कामगिरी केली.

बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धा यंदा भारताच्या चेन्नई शहरात खेळवली गेली. या स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी करत भारताच्या महिला गटाने कांस्य पदकाला गवसणी घातली. भारतीय संघातून कोनेरू हंपी, हरिका द्रोणवल्ली, तानिया सचदेव, आर वैशाली आणि भक्ती कुलकर्णी यांनी मिळून ही कामगिरी करुन दाखवली. यातील हरिका ही गर्भवती असतानाही तिने अशा स्थितीतही खेळत एक प्रेरणादायी उदाहरण सर्वांसमोर ठेवलं आहे.

विजयानंतर तिने प्रतिक्रिया देताना म्हटलं, ”मी वयाच्या 13 व्या वर्षी भारतीय महिला बुद्धिबळ संघात पदार्पण करून आतापर्यंत खेळत आहे. 18 वर्षे झाली आहेत आणि आतापर्यंत 9 ऑलिम्पियाड खेळल्यानंतर भारतीय महिला संघासाठी पदक घेण्यासाठी पोडियमवर येणं माझं स्वप्न होतं. जे आता शेवटी यावेळी पूर्ण झाले आहे. त्यात मी 9 महिन्यांची गर्भवती असताना हे स्वप्न साकार झाल्याने हे अधिक भावनिक आहे. जेव्हा मी भारतात ऑलिम्पियाड आयोजित केल्याबद्दल ऐकले आणि तेव्हा माझ्या डॉक्टरांशी खेळण्याबाबत सल्ला घेतला. तेव्हा त्यांनी तू योग्य काळजी घेऊन तणाव न घेता तू खेळ खेळू शकतेस सांगितले. त्यामुळे माझा संपूर्ण वेळ हा सराव आणि सामन्यात गेल्याने कोणतीच पार्टी, बेबी शॉवर तसंच सेलिब्रेशन करता आलं नाही. पण मी ठरवलं की पदक जिंकल्यावरच मी सेलिब्रेशन करेन आणि अखेर मी हे करुन दाखवलं. भारतीय महिला बुद्धिबळ संघासाठी पहिले ऑलिम्पियाड पदक जिंकून दिले आहे” असे ती यावेळी म्हणाली.

Previous articleमहामार्ग चौपदरीकरणाचे काम दर्जात्मक होण्यासाठी आम. निकमानी घेतली मंत्री नितीनजी गडकरी यांची भेट
Next articleकॉमेडी किंग राजू श्रीवास्तव यांची प्रकृती गंभीर, व्हेंटिलेटरवर ठेवले
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here