Home Breaking News कॉमेडी किंग राजू श्रीवास्तव यांची प्रकृती गंभीर, व्हेंटिलेटरवर ठेवले

कॉमेडी किंग राजू श्रीवास्तव यांची प्रकृती गंभीर, व्हेंटिलेटरवर ठेवले

44
0

आशाताई बच्छाव

IMG-20220811-WA0035.jpg

कॉमेडी किंग राजू श्रीवास्तव यांची प्रकृती गंभीर, व्हेंटिलेटरवर ठेवले                                              दिल्ली,(युवा मराठा न्युज नेटवर्क)

कॉमेडी किंग राजू श्रीवास्तव यांना काल हृदय झटक्यांनंतर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांच्या प्रकृती विषयी माहिती समोर येत आहे. राजू यांच्या हृदयात ९५ टक्के ब्लॉकेज आढळले आहेत. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं असल्याची माहिती मिळत आहे.

बुधवारी वर्कआउट करत असताना त्यांना छातीत दुखू लागलं. त्यांनतर ते ट्रेडमिलवरुन खाली कोसळले होते. त्यांना तातडीने दिल्लीच्या एम्समध्ये दाखल करण्यात आलं होतं. येथे तपासणीत त्यांच्या हृदयाच्या मुख्य धमनीत ब्लॉक आढळून आला आहे. अशा स्थितीत डॉक्टरांनी दोन स्टेंट टाकून त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली आहे.

डॉ.अनन्या गुप्ता यांच्या मते, राजू श्रीवास्तव यांची बीपी नियंत्रणात येत नाहीय. सामान्यतः अँजिओप्लास्टी केल्यानंतर रुग्णाची प्रकृती पूर्वपदावर येते आणि त्याला वॉर्डात हलवले जाते. राजू श्रीवास्तव यांच्यावर अँजिओप्लास्टी केल्यानंतरही त्यांची बीपी 80/56 इतकी कायम आहे. त्यामुळे प्रकृती अत्यंत गंभीर आहे. त्यांना स्वतःहून श्वास घेता येत नाही. तर सध्या व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे, असे डॉक्टरांनी सांगितले.

Previous article9 महिन्यांची गर्भवती, तरीही हरिका द्रोणावल्लीने बुद्धिबळ स्पर्धेत जिंकल कांस्य पदक
Next articleजयगड-उंडी फाट्यावर झालेल्या दुचाकी व स्कूलबसमध्ये झालेल्या अपघातात तरुणाचा मृत्यू
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here