• Home
  • तहसिल कार्यालय व ग्राहक पंचायत संघटनेच्या संयुक्त विद्यमाने. मुखेड तहसिल कार्यालयात जागतिक ग्राहक हक्क दिन साजरा.

तहसिल कार्यालय व ग्राहक पंचायत संघटनेच्या संयुक्त विद्यमाने. मुखेड तहसिल कार्यालयात जागतिक ग्राहक हक्क दिन साजरा.

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220329-WA0077.jpg

तहसिल कार्यालय व ग्राहक पंचायत संघटनेच्या संयुक्त विद्यमाने.

मुखेड तहसिल कार्यालयात जागतिक ग्राहक हक्क दिन साजरा.

नांदेड / मनोज बिरादार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क

तहसिल कार्यालय व महाराष्ट्र ग्राहक पंचायत संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने मुखेड तहसिल कार्यालयाच्या सभागृहात दि.२९ मार्च रोजी जागतिक ग्राहक हक्क दिन साजरा करण्यात आला.
सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार काशिनाथ पाटील हे होते तर प्रमुख पाहुन म्हणुन ग्राहक पंचायत संघटनेचे जिल्हा सचिव अशोक बच्चेवार, नायब तहसिलदार आर.आर.पदमवार, पेशकार गुलाब शेख, तालुकाध्यक्ष बालाजी वाडेकर,पुरवठा विभागाचे शंकर वैद्य, लिपिक बी.एल.सूर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रमाची सुरुवात स्वामी विवेनकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन करण्यात आली, कार्यक्रमाचे सुत्रसंचलन शंकर वैद्य यांनी केले.
यावेळी महाराष्ट्र ग्राहक पंचायत संघटनेचे जिल्हा निमंत्रित सदस्य महेताब शेख, मुखेड ग्राहक पंचायतचे सचिव खाजा धुंदी, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर डोईजड, उपाध्यक्ष रामेश्वर पाटील इंगोले यांनी आपल्या मनोगतातुन निराधार मानधन, वीज बिल, गॅस रक्कम, राशन कार्ड, टोल वसुली, बीएसएनएल इंटरनेट, हॉटेल बाहेर पदार्थ, बँक कर्मचाऱ्यांची मनमानी, पेट्रोलपंप वरील अडचण असे ग्राहकांशी निगडित असलेल्या विविध प्रश्नांवर आवाज उठवत विविध ठिकाणी ग्राहकांची होत असलेली पिळवणुक व हेळसांड थांबविण्याकरिता जनजागृती करावी व त्यांना उद्भवत असलेेल्या समस्या अडीअडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत अशी आग्रही भुमिका प्रशासनाकडे मांडली.
यावेळी कार्यक्रमास ग्राहक पंचायत संघटनेचे प्रा. अखिल येवतीकर, रिपब्लिकन सेनेचे श्रावण नरबागे, स्वस्त धान्य दुकानदार रावसाहेब पाटील शिंदे, पंढरी हळनुरे, बस्वराज हिरेमठ, बालाजी पा लंगोटे, कोतवाल शरद नरबागे, माधव गायकवाड, शिपाई बलभीम चावरे, राजाराम चिकटवाड, पत्रकार मुजीब सय्यद, अविनाश कांबळे, राजेश दिपके, गजानन मोडे यांच्यासह ग्राहक पंचायतसंघटनेचे पदाधिकारी , तहसील कार्यालयाचे कर्मचारी व अधिकारी व ग्राहक उपस्थित होते.

anews Banner

Leave A Comment