Home मुंबई मुंबईतील ६६ वी विवेकानंद व्याख्यानमाला.

मुंबईतील ६६ वी विवेकानंद व्याख्यानमाला.

139

आशाताई बच्छाव

IMG_20231122_060932.jpg

मुंबईतील ६६ वी विवेकानंद व्याख्यानमाला.

मुंबई -: प्रतिनिधी विजय पवार
चिंचपोकळी येथील विद्यार्थी उत्कर्ष मंडळाच्या वतीने ६६ व्या विवेकानंद व्याख्यानमालेचे आयोजन लालबाग येथील गरमखाडा मैदानात २८ नोव्हेंबर ते २ डिसेंबर या कालावधीत रात्रौ ८.३० वाजता करण्यात आले आहे. व्याख्यानमालेचे पहिले पुष्प २८ नोव्हेंबर रोजी ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे राज्याभिषेक जाणत्या राजाचा या विषयावर तर २९ नोव्हेंबर रोजी दुसरे पुष्प मी वगैरे या विषयावर कवी आणि गीतकार वैभव जोशी बोलणार असून त्यांची मुलाखत समीरा गुजर- जोशी घेणार आहेत. ३० नोव्हेंबर रोजी तिसरे पुष्प विज्ञान पत्रकार मयुरेश प्रभुणे कुतूहल चांद्रयानाचे या विषयावर तर १ डिसेंबर रोजी चौथे पुष्प उद्योजक आणि प्रशिक्षक महेंद्र शिंदे नव्या युगाचे नवे पालक या विषयावर तर पाचवे आणि अंतिम पुष्प २ डिसेंबर रोजी नवीन शैक्षणिक धोरण : संधी आणि आव्हाने या विषयावर मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू रवींद्र कुलकर्णी गुंफणार आहेत. संस्थेचे सभासद, विभागातील नागरिक तसेच जाहिरातदारांनी व्याख्यानमालेला उपस्थित रहावे असे आवाहन व्याख्यानमाला प्रमुख निलेश घोडेकर यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क ९९८७२२९२१६.
स्थळ- लालबाग, छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण, (गरमखाडा मैदान), डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्ग, मुंबई 400012

Previous articleखोट्या संघटना वर कायदेशीर गुन्हे दाखल करण्याची मागणी             
Next articleबेकायदेशीर लोह खाणींविरोधात हिवाळी अधिवेशनात आवाज उठविणार
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.