Home गडचिरोली बेकायदेशीर लोह खाणींविरोधात हिवाळी अधिवेशनात आवाज उठविणार

बेकायदेशीर लोह खाणींविरोधात हिवाळी अधिवेशनात आवाज उठविणार

64
0

आशाताई बच्छाव

IMG_20231122_061411.jpg

 

बेकायदेशीर लोह खाणींविरोधात हिवाळी अधिवेशनात आवाज उठविणार

प्रागतिक पक्ष आघाडीच्या जिल्हास्तरीय बैठकीत निर्णय

गडचिरोली,(सुरज गुंडमवार )-: गडचिरोली जिल्हा अनुसूचित क्षेत्रात समाविष्ठ असून पेसा,वनाधिकार कायदे लागू असतांना बेकायदेशीरपणे विविध ठिकाणी लोह खाणी स्थानिक ग्रामसभा आणि जनतेच्या विरोधानंतरही बळजबरीने मंजुर व प्रस्तावित करण्यात येवून त्या खोदण्यात येत आहेत. याविरोधात ग्रामसभांची भूमिका प्रागतिक पक्ष, महाराष्ट्र च्या आघाडीतील आमदारांनी येत्या हिवाळी अधिवेशनात लावून धरुन आवाज बुलंद करावा,असा निर्णय जिल्हास्तरीय बैठकीत घेण्यात आला.

स्थानिक पत्रकार भवन येथे प्रागतिक पक्ष, महाराष्ट्र च्या गडचिरोली जिल्हा समन्वय समितीची जिल्हास्तरीय बैठक आयोजित करण्यात आली होती. सभेच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे केंद्रीय उपाध्यक्ष रोहिदास राऊत होते. यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव काॅ. देवराव चवळे, ॲड. जगदीश मेश्राम, शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई रामदास जराते, जयश्रीताई वेळदा, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव काॅ. अमोल मारकवार, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पक्षाचे जिल्हा प्रभारी राज बन्सोड, प्रतिक डांगे, गोंडवाना गणतंत्र पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रशांत मडावी, आदिवासी विकास युवा परिषदेचे जिल्हाध्यक्ष कुणाल कोवे, विनोद मडावी प्रामुख्याने उपस्थित होते.

गडचिरोली जिल्ह्यातील डावे, पुरोगामी राजकीय पक्ष, संघटना आणि पारंपारिक इलाखे व ग्रामसभा एकत्र येवून मागील अनेक वर्षांपासून खदान विरोधी आंदोलन चालविण्यात येत आहे. मात्र राजकीय स्वार्थापोटी काही भांडवलदार प्रेरीत लोकांनी या आंदोलनात फुट पाडून आपला स्वार्थ साधण्याचा सातत्याने प्रयत्न केला गेला. यातूनच वेळोवेळी आंदोलकांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न झाला. याबाबत प्रस्थापित काॅग्रेस, भाजप, सेना, राष्ट्रवादी यांनी जाणूनबुजून दुर्लक्ष केले. त्यामुळे वनहक्क, पेसा, रोजगार हमी योजना लागू करण्यास सरकारला बाध्य करणारे प्रागतिक पक्ष, यांच्यासह ग्रामसभांनी एकत्र येवून येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात बेकायदेशीर लोह खाणी, पेसा क्षेत्रातील नोकर भरती, नदी,नाले, तलावांर मच्छीमार समाजाची मालकी अशा विविध प्रश्नांवर पाठपुरावा करावा. प्रागतिक पक्ष, महाराष्ट्र आघाडीतील पक्षांच्या आमदारांनी विधिमंडळात याबाबत आवाज बुलंद करुन जनतेला न्याय द्यावा, असे या बैठकीत ठरविण्यात आले.

तसेच तोडगट्टा आंदोलनाबाबत प्रागतिक पक्ष, महाराष्ट्र आघाडीच्या वतीने जिल्हाप्रशासनाशी निवेदन देवून चर्चा करावी असेही ठरविण्यात आले.

या बैठकीला अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे शहराध्यक्ष नरेंद्र रायपूरे, माजी जिल्हा परिषद सदस्य क्रांती केरामी, पत्रकार हेमंत डोर्लीकर, शेकापचे डॉ. गुरुदास सेमस्कर, तुकाराम गेडाम, अशोक किरंगे, तितिक्षा डोईजड, विजया मेश्राम, रेश्मा रामटेके, ग्रामसभेचे नितीन पदा, कोत्तुराम पोटावी, बाजीराव उसेंडी, प्रशांत गोटा यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous articleमुंबईतील ६६ वी विवेकानंद व्याख्यानमाला.
Next articleपश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here