Home पुणे यवत येथील हॉटेल चालकास ४,४२,५०० रुपयांचा गंडा घालणाऱ्या तोतया फुड इन्स्पेक्टरला केले...

यवत येथील हॉटेल चालकास ४,४२,५०० रुपयांचा गंडा घालणाऱ्या तोतया फुड इन्स्पेक्टरला केले यवत पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने जेरबंद

93
0

आशाताई बच्छाव

IMG-20220611-WA0010.jpg

युवा मराठा न्यूज प्रतिनिधी प्रशांत नागणे

यवत येथील हॉटेल चालकास ४,४२,५०० रुपयांचा गंडा घालणाऱ्या तोतया फुड इन्स्पेक्टरला केले यवत पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने जेरबंद

दि.०३/०५/२०२२ रोजी दुपारी १२:३० वा. ते दि.०२/०६/२०२२ रोजी सायं.५:३० वाचे.पर्यत वेळोवेळी यातील हॉटेल मालकास मुंबई मंत्रालयातुन फुड इन्स्पेक्टर असल्याचे भासवुन तुमच्या हाॅटेलची तक्रार माझेकडे आलेली आहे. तुमच्या हाॅटेलमुळे एका महीलेला फुड पाॅयजन झाले आहे म्हणुन तिने माझेकडे तक्रार दिलेली आहे. त्यामुळे आमची टिम तुमचे हाॅटेल सिल करण्यासाठी तुमच्याकडे येत आहे. तुमच्यावर कारवाई करायची नसेल तर तुंम्ही मी सांगतो त्या खात्यावर पैसे जमा करा असे सांगुन सदर हॉटेल मालक यांचेकडून वेळोवेळी एकुण ४,४२,५००/- रूपये ऑनलाईन घेवुन फसवणुक केले बाबत यवत पोलीस स्टेशन येथे गु.र.नं.-४८७/२०२२ भा.द.वि. कलम ४२० असा गुन्हा दाखल आहे.
सदर गुन्हयाच्या अनुषंगाने यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी सदर गुन्हयचा तपास गुन्हे शोध पथकाचे पोलीस उप निरीक्षक नागरगोजे यांच्याकडे देऊन गुन्हा लवकरात लवकर उघडकीस आणावयास सांगीतल्याने पोलीस उप निरीक्षक नागरगोजे यांनी तपासाची सूत्रे फिरवून सदर चा आरोपी हा वेगवेगळ्या बोगस मोबाईल नंबर वरून फोन करत असुन तांत्रिक माहितीच्या आधारे ते सोलापूर येथे असल्याबाबत माहिती झाल्याने यवत पोलीस स्टेशन चे गुन्हे शोध पथक यांनी सोलापूर येथे जाऊन आरोपी नामे १)सुरज सुरेश काळे वय ४० वर्षे रा मधूबन नगर सोलापूर २)धर्मराज शिवाप्पा शिकलवाडी वय ३६ वर्षे रा रामवाडी धोंडिबा वस्ती, सोलापूर हे दोघेही एका ऑनलाइन मनी ट्रान्सफर शॉप वर फिर्यादी यांनी पाठवलेले पैसे नेण्याकरिता आले असता त्यांना तांत्रिक माहितीच्या आधारे तसेच ते रिक्षा मध्ये पळून जात असताना त्यांच्या पाठलाग करून अतिशय शिताफीने पकडून जेरबंद केले.
सदरची कामगिरी
मा. पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख सो,अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते,उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस, पोलीस निरीक्षक नारायण पवार यवत पोलीस स्टेशन यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे
पोलीस उप निरीक्षक संजय नागरगोजे
पो.ना.राम जगताप
पो.कॉ.प्रवीण चौधरी
पो.कॉ.मारुती बाराते
यांनी केलेली आहे.

Previous articleकोरवाडी येथील पांदन रस्ता बोगस होत असल्याची तक्रार.
Next articleचांदवड तालुक्यातल्या कळमदरे येथील सैनिकाचा मृत्यू
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here