Home नाशिक चांदवड तालुक्यातल्या कळमदरे येथील सैनिकाचा मृत्यू

चांदवड तालुक्यातल्या कळमदरे येथील सैनिकाचा मृत्यू

44
0

आशाताई बच्छाव

IMG-20220611-WA0012.jpg

चांदवड तालुक्यातल्या
कळमदरे येथील सैनिकाचा मृत्यू
(सुनील गांगुर्ड प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)
चांदवड-तालुक्यातील कळमदरे येथील रहिवाशी आणि भारतीय सैन्य दलात (सीआयएसएफ) हेड काँन्टेबल म्हणून कार्यरत असलेले अर्जून लुकाराम गांगुर्ड वय ५१ वर्ष यांचा ओडीसात कर्तव्य बजावीत असताना हदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला.
अर्जून गांगुर्ड हे सन १९९१मध्ये भारतीय सैन्य दलातील सीआयएसएफ विभागात भरती झाले होते.ते सध्या हेड काँन्सटेबल पदावर कार्यरत होते.त्यांचा मुलगा रोहन गांगुर्ड यांचीही काही दिवसापूर्वीच सैन्य दलातील लेप्टनन्टपदी नियुक्ती झाली.गांगुर्ड सध्या कुटूंबियासह नाशिक येथे वास्तव्यास होते.ओडीसा येथील राहुर किल्ला परिसरात आपले कर्तव्य बजावत असताना त्यांना अचानक हदयविकाराचा त्रास झाला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.त्यांचे पार्थिव कळमदरे,ता.चांदवड या त्यांच्या मुळगावी आणले जाणार असून,त्यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here