Home परभणी कोरवाडी येथील पांदन रस्ता बोगस होत असल्याची तक्रार.

कोरवाडी येथील पांदन रस्ता बोगस होत असल्याची तक्रार.

91
0

आशाताई बच्छाव

IMG-20220611-WA0014.jpg

कोरवाडी येथील पांदन रस्ता बोगस होत असल्याची तक्रार.

शत्रुघ्न काकडे पाटील (युवा मराठा न्युज नेटवर्क ब्युरो चीफ)

जिंतूर(परभणी):-तालुक्यातील कोरवाडी येथील नरेगा अंतर्गत पांदण रस्ता बोगस होत असल्याची तक्रार दि.7 जून रोजी तहसीलदार यांच्याकडे गजानन डाखुरे यांनी दिली आहे. कोरवाडी येथील जिंतूर ते कवडा रोडवर मंगेश राऊत यांच्या शेतापर्यंत एक कि.मी. नरेगा अंतर्गत मातोश्री पांदन रस्ता हा जवळपास चोवीस लाख रुपये खर्च करून होत आहे हा रस्ता थातूरमातूर करून बोगस होत असल्याची तक्रार गजानन डाखुरे या शेतकर्‍यांनी केली आहे. गजानन डाखुरे यांच्या शेता शेजारील ओढा आहे हा पांदण रस्ता करताना चक्क ओढा बुजवून त्या ओढ्याची रुंदी कमी करून हा रस्ता बनवण्याचे काम सदर गुत्तेदार हे करीत आहेत आणि याच गुत्तेदाराचे शेत ओढ्याच्या काठावर असल्याने आपले शेत रस्त्यात जाऊ नये म्हणून ओढ्याची रुंदी कमी करून पांदन रस्ता सदर गुत्तेदार बनवित असल्याने अर्जदार गजानन डाखुरे यांच्या शेतात ओढ्याचे पाणी येऊ शकते म्हणून सदर शेतकऱ्याने हा बोगस रस्ता थांबून चौकशी करण्याची मागणी तहसीलदार जिंतूर तसेच गटविकास अधिकाऱ्यांकडे दि.7 जून रोजी लेखी तक्रार केली आहे .

प्रतिक्रिया,
हे काम करीत असताना नियमाने काम करणे गरजेचे आहे. ओढ्यची रुंदी लहान न करता हा पांदन रस्ता करणे गरजेचे आहे. जेणेकरून कोणत्याही शेतकऱ्याच्या शेतात पाणी शिरू नये याची दक्षता घेणे गरजेचे आहे.
सौ. माया दिनकर आलाटे,सरपंच कोरवाडी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here