Home नाशिक श्रीक्षेत्र वनसगावला ११ रोजी धर्म ध्वजारोहण सोहळा-

श्रीक्षेत्र वनसगावला ११ रोजी धर्म ध्वजारोहण सोहळा-

171
0

आशाताई बच्छाव

IMG_20240310_065130.jpg

श्रीक्षेत्र वनसगावला ११ रोजी धर्म ध्वजारोहण सोहळा–
वैराग्यमूर्ती तुकाराम बाबा जेऊरकर यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण संपन्न होणार

दैनिक युवा मराठा महासंघ
निफाड नाशिक प्रतिनिधी रामभाऊ आवारे

अक्कलकोट ब्रम्हांडनायक भगवान पंढरीश पांडुरंगाच्या कृपेने वै प पु भागवत बाबा शिंदे खडक माळेगावकर व वै प पु संतदास बाबासाहेब काका शिंदे यांच्या शुभप्रेरणेने संत तुकाराम बीज व शांती ब्रह्म एकनाथ महाराज षष्ठी निमित्ताने २६ मार्च ते २ एप्रिल दरम्यान होत असलेल्या सुवर्ण महोत्सवी अखंड हरिनाम सप्ताहाच्या कार्यक्रमासाठी ध्वजपूजन व ध्वजारोहण सोहळा सोमवार ११ मार्च रोजी दुपारी ३ वाजता वैराग्यमूर्ती ह भ प तुकाराम बाबा जेऊरकर यांच्या शुभहस्ते संपन्न होणार असल्याची माहिती सप्ताह समितीचे प्रसिद्धीप्रमुख रामभाऊ आवारे यांनी दिली आहे.
दुपारी वेदशास्त्र पारंगत प्रशांत गव्हाले गुरुजी यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवार अकरा मार्च रोजी दुपारी तीन वाजता जेष्ठ वारकरी मुरलीधर बहिरुनाथ शिंदे व सौ सरलाताई मुरलीधर शिंदे, अशोकराव महिफतराव डुंबरे व सौ निर्मला अशोक डुंबरे, रतनसेठ गोटीराम व्यवहारे व सौ शोभा रतनसेठ व्यवहारे, विश्वनाथ शंकर कापडी व सौ जयश्री विश्वनाथ कापडी तसेच अशोक निवृत्ती जाधव व
सौ कविता अशोक जाधव या प्रमुख सापत्नीक जोडीच्या शुभहस्ते ध्वज पूजन होणार आहे.
याप्रसंगी विश्वनाथ शिवालय मंदिरापासून टाळ मृदंगाच्या गजरात पायी दिंडी निघणार असून या दिंडीत महिलांनी त्या मार्गावर सडा समार्जन करुन ध्वज भोवती रांगोळी सजावट करून कार्यक्रमाची शोभा वाढवावी. ध्वजारोहण सोहळ्यासाठी समस्त ग्रामस्थ, सुवर्ण महोत्सवी अखंड हरिनाम सप्ताहातील विविध समिती सदस्य तसेच समस्त भजनी मंडळ आदींनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आव्हान सप्ताह कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.

Previous articleश्रीक्षेत्र थेटाळे येथे महाशिवरात्री उत्सवानिमित्त संगीतमय श्री शिव महापुराण कथा–
Next articleसावित्रीबाई फुले स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here