Home राजकीय खासदार अमोल कोल्हे यांना गोळ्या घालण्याची भाषा! तिघांनवर गुन्हा दाखल

खासदार अमोल कोल्हे यांना गोळ्या घालण्याची भाषा! तिघांनवर गुन्हा दाखल

92
0

🛑 खासदार अमोल कोल्हे यांना
गोळ्या घालण्याची भाषा! तिघांनवर गुन्हा दाखल 🛑
पुणे 🙁 विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

पुणे :⭕ अक्षय बो-हाडे प्रकरणावरुन खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यावर तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांवर अश्लिल कमेंट्स करणाऱ्या व जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या शिर्डी (जि. नगर) येथील तिघांवर नारायणगाव पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. संदीप पाटील यांच्याकडे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी तक्रार केल्यानंतर सदर गुन्हा दाखल करण्यात आला असून तिनही आरोपी लवकर नारायणगाव पोलिस स्टेशनमध्ये हजर केले जाणार असल्याची माहिती नारायणगाव पोलिसांनी दिली.
अक्षय बोऱ्हाडे प्रकरणावरुन गेल्या पाच दिवसात संपूर्ण राज्यभर चांगलेच राजकारण रंगले. शिवसेना-राष्ट्रवादी, राष्ट्रवादी-भाजपा असे कार्यकर्त्यांचे गट होवून चर्चा, आरोप-प्रत्यारोप, हेवे-दावे असे सगळे नाट्य घडले आणि त्यातच जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांची इंट्री झाल्यानंतर हे प्रकरण पेल्यातले वादळ ठरले. दरम्यानच्या काळात शिर्डी (जि.नगर) येथील ‘देशमुख फ्रेंड सर्कल, महाराष्ट्र राज्य’ या फेजबुक ग्रुपवरील तिघांनी अक्षय बो-हाडे प्रकरणी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची पाठराखण करणारांची गय नाही, भावपूर्ण श्रध्दांजली असा मजकुर लिहून डॉ. कोल्हे यांच्यावर अश्लाघ्य भाषेत टिका केली. या शिवाय त्यांना एकेरी भाषेत बोलून शिर्डीला बोलावले व तिथे आल्यावर गोळ्या घालण्याचे लिखानही अश्लाघ्य भाषेत लिहीले. सदर पोस्ट पाहून डॉ. कोल्हे यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी कोल्हे यांना कळविली. त्यानुसार जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. संदीप पाटील यांनी ही बाब गांभिर्याने घेतली. त्यातच नारायणगाव (ता.जुन्नर) येथील सागर शशिकांत भुजबळ (वय, ४०) यांनी रितसर तक्रार दाखल करताच शिर्डीच्या तिन आरोपींवर आयटी अ‍ॅक्ट व शिवीगाळ, जिवे मारण्याची धमकी आदी गुन्हे दाखल करण्यात आले असून लवकरच तिघांनाही अटक करुण प्रकरणाच्या अधिक खोलात जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान या प्रकरणी नारायणगाव पोलिसांनीही वरील माहितीला तसेच गुन्हा दाखल होवून तपास सुरू केल्याच्या माहितीला दुजोरा दिला.

Previous articleवाढदिवसानिमित भेट दिले सँनिटाँयझर मशिन अनोखा उपक्रम*
Next articleजिल्हासाठी दिलासादायक बातमी १६५२ पैकी १०४९ रुग्ण करोनामुक्त !
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here