• Home
  • वाढदिवसानिमित भेट दिले सँनिटाँयझर मशिन अनोखा उपक्रम*

वाढदिवसानिमित भेट दिले सँनिटाँयझर मशिन अनोखा उपक्रम*

*वाढदिवसानिमित भेट दिले सँनिटाँयझर मशिन अनोखा उपक्रम*
डांगसौंदाणे,(अशोक बहिरम प्रतिनिधी युवा मराठा न्युज)-
_वाढदिवसाच्या खर्चाला फाटा देत येथील स्वामी समर्थ विद्या प्रसारक मंडळ डांगसौंदाणेचे अध्यक्ष सुरेश वाघ यांनी बँक ऑफ़ महाराष्ट्र शाखेला दिले सेंसर सिस्टिमचे ऑटोमॅटिक सॅनेटाइझर मशीन_ ….

_पंचक्रोशितील एकमेव राष्ट्रीयकृत असलेली येथील बँक ऑफ़ महाराष्ट्रला 25 हजार हुन अधिक ग्राहक आहेत. रोजच इथे असलेली ग्राहकांची गर्दी लक्ष्यात घेता कोरोनाच्या या लढ्यात बँक अधिकारी  कर्मचारी यांचा कोरोना पासून बचाव व्हावा  या उद्देशाने वाढदिवसाच्या अतिरिक्त खर्च टाळत वाघ यांनी आज हे मशीन उपलब्ध करुण दिले या मशीन मुळे बँकेत येणाऱ्या ग्राहकाला  आपले हात निर्जंतुकीकरण करता येणार आहेत वाघ यांनी मशीन उपलब्ध करुण दिल्या बद्दल शाखा व्यवस्थापक तपन गुप्ता साहेब, रवी कुमार,स्नेहल रौंदळ,यांनी सुरेश वाघ यांचे आभार मानले आहेत. या प्रसंगी जेष्ठ पत्रकार हेमंत चंद्रात्रे,पत्रकार नीलेश गौतम,साकोड़े शाळेचे मुख्याध्यापक मुरलीधर मुसळे,गोंविंद जाधव, भास्कर बागुल, कृष्णताई पवार आदी उपस्थित होते_

anews Banner

Leave A Comment