• Home
  • निवासी डॉक्टरांचे आंदोलन

निवासी डॉक्टरांचे आंदोलन

🛑 निवासी डॉक्टरांचे आंदोलन 🛑
पुणे 🙁 विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

पुणे ⭕: विद्यावेतनातील वाढीच्या मागणीसाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील (वायसीएम) सीपीएस निवासी डॉक्टरांनी सोमवारी आंदोलन केले.

जीवावर उदार होऊन करोनाविरोधात डॉक्टर लढत आहेत. मात्र, तुटपुंजे मानधन दिले जाते, याकडे डॉक्टरांनी लक्ष वेधले. मुंबई महापालिकेप्रमाणे विद्यावेतनात वाढ करावी, अशी मागणी या वेळी करण्यात आली. महापालिका प्रशासन विद्यावेतन वाढ देण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

महापालिकेचे वायसीएम रुग्णालय कोव्हिड-१९साठी समर्पित आहे. रुग्णालयातील ३३ सीपीएस निवासी डॉक्टर २४ तास सेवा करीत आहेत. त्यांना ऑगस्ट २०१८पासून २४ हजार ८०० रुपये विद्यावेतन मिळत आहे. ते तुटपुंजे असल्याचे स्पष्ट करून सध्या करोना साथीच्या परिस्थितीमध्ये संसर्ग होऊन जीवाला धोका होण्याची जास्त भीती असल्याचे त्यांनी म्हटले आहे. विद्यावेतन कमी मिळत असल्याने शहरात राहणे कठीण झाले आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, ठाणे महापालिकेत पूर्वीपासून भेदभाव न करता समान विद्यावेतन दिले जाते. मुंबई महापालिकेने करोनाचे गांभीर्य लक्षात घेऊन तत्काळ सीपीएस निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात वाढ केली आहे. परंतु, आम्ही एमबीबीएस पदवीप्राप्त असूनही इतर निवासी डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी यांच्यासारखेच आणि त्यांच्या इतकेच काम करत आहोत. तरीही विद्यावेतनात फार मोठी तफावत असल्याचे सीपीएस निवासी डॉक्टरांनी सांगितले.

वायसीएममधील सीपीएस निवासी डॉक्टरांच्या मागणीबाबत पालिका प्रशासन सकारात्मक आहे. त्या संदर्भातील प्रस्ताव मुख्य प्रशासकीय कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे. आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी मंजुरी दिल्यास तातडीने कार्यवाही केली जाईल. ⭕

– डॉ. राजेंद्र वाबळे, अधिष्ठाता

anews Banner

Leave A Comment