• Home
  • जिल्हासाठी दिलासादायक बातमी १६५२ पैकी १०४९ रुग्ण करोनामुक्त !

जिल्हासाठी दिलासादायक बातमी १६५२ पैकी १०४९ रुग्ण करोनामुक्त !

🛑 जिल्हासाठी दिलासादायक बातमी १६५२ पैकी १०४९ रुग्ण करोनामुक्त ! 🛑
औरंगाबाद:( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

औरंगाबाद :⭕ जिल्ह्यात पुन्हा ५५ कोरोना बाधितांची वाढ झाल्याने एकूण कोरोना बाधितांची संख्या १६४२ झाली आहे. तसेच आणखी एका कोरोनाबाधित रुग्णाचा उपचारादरम्यान सोमवारी रात्री साडेअकरा वाजता खासगी रुग्णालयामध्ये मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोना बळींची संख्या ७९ झाली आहे. एकूण बाधितांपैकी १०४९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, तर आता ५१४ बाधितांवर उपचार सुरू आहे.

नव्याने आढळलेल्या रुग्णांचा तपशील
शहा बाजार येथील १, किराडपुरा २, चंपा चौक १, कटकट गेट १, नारळीबाग १, गणेश कॉलनी १, जवाहर नगर ३, भीम नगर २, हमालवाडी १, शिवशंकर कॉलनी २, नाथ नगर २, ज्योती नगर १, फजलपुरा परिसर १, मिल कॉर्नर १, एन-तीन सिडको १, एमजीएम परिसर १, रोशन गेट १, विशाल नगर, गारखेडा परिसर १, एन-सहा संभाजी कॉलनी ७, समता नगर ५, अंहिसा नगर १, मुकुंदवाडी १, विद्या निकेतन कॉलनी १, न्याय नगर १, बायजीपुरा २, संजय नगर, मुकुंदवाडी ४, विजय नगर २, यशवंत नगर, पैठण १, चंपा चौक, म्हाडा कॉलनी १, नेहरु नगर १,जुना मोंढा नाका परिसर १, अन्य भागातील ३ रहिवाशांचा समावेश आहे.
यामध्ये २४ महिला आणि ३१ पुरुष रुग्ण आहेत
औरंगाबाद जिल्ह्यात सोमवारी ४४ काेराेना रुग्ण वाढले, त्यामुळे एकूण रुग्णसंख्या १५८७ झाली. दिवसभरात सहा कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये शहरातील पाच, तर जळगाव जिल्ह्यातील एका महिलेचा समावेश आहे. त्यामुळे शहरातील कोरोनाच्या एकूण बळींची संख्या ७७ झाली अाहे. मृतांमध्ये बेगमपुरा येथील ६६ वर्षीय महिला, बारी कॉलनीतील ६३ वर्षीय पुरुष, बायजीपुरा येथील ६० वर्षीय पुरुष, भाग्यनगरातील ८० वर्षीय आणि समता नगरातील ७२ वर्षीय पुरुषाचा समावेश अाहे. जळगावच्या बडगुजर कॉलनी यावल येथील ६६ वर्षीय महिलेचाही घाटीत उपचारादरम्यान मृत्यू झाला. सहापैकी दाेघांचा घाटीत तर चाैघांचा खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. दरम्यान, सोमवारी ३५ जणांना डिस्चार्ज मिळाला. आतापर्यंत एकूण १०६४ जण काेराेनामुक्त झाले असून आता फक्त ४६० काेराेनाग्रस्त रुग्णांवर उपचार सुरू आहेत.⭕

anews Banner

Leave A Comment