Home नाशिक श्रीक्षेत्र थेटाळे येथे महाशिवरात्री उत्सवानिमित्त संगीतमय श्री शिव महापुराण कथा–

श्रीक्षेत्र थेटाळे येथे महाशिवरात्री उत्सवानिमित्त संगीतमय श्री शिव महापुराण कथा–

236
0

आशाताई बच्छाव

IMG_20240310_062710.jpg

श्रीक्षेत्र थेटाळे येथे महाशिवरात्री उत्सवानिमित्त संगीतमय श्री शिव महापुराण कथा–

श्री श्री 1008 महामंडलेश्वर शिवगिरी महाराज यांच्या अमृतवाणीतून कथेचे निरुपण–

दैनिक युवा मराठा
निफाड नाशिक प्रतिनिधी रामभाऊ आवारे

श्रीक्षेत्र थेटाळे तालुका निफाड येथील नागेश्वर महादेव मंदिर परिसरात महाशिवरात्रीनिमित्त ह भ प मंगलनाथ महाराज यांच्या प्रेरणेने सोमवार ११ मार्च पासून राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी यांचे कृपा पात्र शिष्य राष्ट्रीय अध्यक्ष अनंत विभुषित श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी शिवगिरी महाराज (राष्ट्रीय अध्यक्ष श्री पंचदशनाम जुना आखाडा, निलपर्वत त्र्यंबकेश्वर, महाराष्ट्र) यांच्या अमृतवाणीतून दररोज रात्री ८ ते १० या वेळेत संगीतमय श्री शिव पुराण महापुराण कथेचे आयोजन करण्यात आलेले आहे तरी या भक्ती ज्ञानामृताचा सर्व भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन समस्त ग्रामस्थ व आयोजक कमिटीने केले आहे.
सोमवार ११ ते सोमवार १८ मार्च या कालावधीत दररोज रात्री सायंकाळी ६ ते ८ महाप्रसाद व ८ ते १० श्री शिव महापुराण कथा संपन्न होणार आहे. सोमवार दि.११/०३/२०२४ रोजी सायं ४ ते ६ भव्य पालखी मिरवणुक व सोमवार दि. १८/०३/२०२४ रोजी स.१० ते १२ वा. किर्तन केसरी ह.भ.प. सुनिल महाराज झांबरे, बिड यांचे काल्याचे किर्तन होऊन महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता होईल.
या कार्यक्रमासाठी गायनाचार्यः ह.भ.प. अंबादास महाराज बोराडे, ह.भ.प.भाऊसाहेब महाराज बोराडे, मृदुंगाचार्य ह.भ.प.दत्ता महाराज साळवे म्हणून आठ ही दिवस साथ देणार आहे.

श्री शिव महापुराण कथेसाठी पुढील प्रमाणे संतवृंद उपस्थित राहणार आहे-
प.पू.स्वामी माधवगिरीजी महाराज,प.पु.स्वामी संतोषगिरीजी महाराज,प.पु.स्वामी बालक गिरीजी महाराज, प.पु.स्वामी विमलगिरी महाराज, प.पु.स्वामी वासुदेवनंद बहुरुपी महाराज, प.पु.स्वामी सुनिलगिरीजी महाराज, प.पु.स्वामी बालकगिरीजी महाराज, प.पु.स्वामी वलरामगिरी महाराज, प.पु.स्वामी सुदामगिरी महाराज, प. पु.स्वामी रमेशगिरीजी महाराज, प.पु.स्वानी संदिपगिरीजी महाराज प.पु. स्वामी दिनेशगिरीजी महाराज,प.पु.स्वामी राघवेश्वरगिरी महाराज, प.पु.स्वामी नामदेवगिरीजी महाराज, प.पु.स्वामी जनेश्वरगिरीजी महाराज, प.पु. स्वामी शिवेश्वरनंदगिरी महाराज, प.पु.स्वामी सिताराम गिरी महाराज, प.पु.स्वामी ओमकारगिरी महाराज,प.पु.स्वामी संतोषगिरी महाराज , प. पु.स्वामी लखनगिरीजी महाराज, प.पु.स्वामी कैलासगिरीजी महाराज / प.पु.स्वामी चिंतामणगिरीजी महाराज, प.पु.स्वामी सोमेश्वरनंद गिरीजी महाराज उपस्थित भजनी मंडळ निफाड साखर कारखाना भाऊसाहेब नगर, कोटमगांव, विठ्ठलवाडी, विंचुर, सुभाषनगर, सोनेवाडी, लोणवाडी, पानेवाडी,उगांव, वनसगांव, कारवाडी, खानगांव, खडक माळेगाव, सारोळे .
श्री शिव महापुराण कथा अन्नदाते पुढीलप्रमाणे –

श्री.दत्तात्रय आनंदा शिंदे , कौतिक रामचंद्र शिंदे, एकलव्य ग्रुप थेटाळे, रामचंद्र सिताराम शिंदे, शाहु दगुजी शिंदे अर्जुन लक्ष्मण शिंदे , केदु निवृत्ती शिंदे, नामदेव पुंजाजी पानगव्हाणे, कचरु आनंदा शिंदे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here