Home माझं गाव माझं गा-हाणं _पिंगळवाडे परिसरात डाळिंबावरील तेल्यारोगामुळे शेतकरी हैराण ._

_पिंगळवाडे परिसरात डाळिंबावरील तेल्यारोगामुळे शेतकरी हैराण ._

123
0

राजेंद्र पाटील राऊत

संदीप गांगुर्डे पिंगळवाडे. युवा मराठा न्युज नेटवर्क
_पिंगळवाडे परिसरात डाळिंबावरील तेल्यारोगामुळे शेतकरी हैराण ._
पिंगळवाडे परिसरात बहुतांश शेतकरी हे फळबागांवर पूर्णपणे निर्धारित आहेत त्याचे प्रमुख्याने डाळिंब ,द्राक्ष हे पिके घेतात पण मात्र या वर्षी पावसाने उघडीप दिल्याने व तापमानात वाढ झाल्याने डाळिंबावरील तेल्या रोगाचे प्रमाण वाढले आहे .
या परिसरात पावसाचे प्रमाण फार कमीआहे त्यामुळे बहुतांशी शेतकऱ्यांनी आपल्या शेतात शेतकऱ्यांची निर्मिती केली आहे. तसेच ज्यांच्याकडे शेततळे नाही अशा शेतकऱ्यांनी कमी पाण्याच्या आधारावर आपल्या फळबागा फुलवलेल्या आहेत. ऐन उन्हाळ्यात फळबागांना पाण्याचे नियोजन करणे हे फार जिकरीचे जाते. फळबागांना आपल्या जीवाचे रान करून शेतकरी बाग फुलवतात तसेच महागडी रासायनिक औषधे ,खते हे सर्व नियोजन करून बागा फुलवतात पण मात्र यावर्षी शेतकऱ्यांचे डाळिंब पिकास तेल्या रोगाने हैराण केले आहे त्याच प्रमाणे डाळिंबावर मर रोगाचा प्रादुर्भाव प्रमाणाबाहेर जास्त दिसून येत आहे या रोगामुळे शेतकरी पूर्णपणे मेटाकुटीला आलेला आहे. या वर्षी डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना या रोगामुळे एक रुपयाही हातात मिळणार नाही. तसेच झालेला खर्च हा पूर्णपणे वाया जाण्याची चिन्ह आहे. यासाठी संबंधित कृषी विभागाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बागांचे पाहणी करावी व पंचनामे करून शेतकऱ्यांना शासन दरबारी भरघोस आर्थिक मदत मिळावी, त्याचप्रमाणे फळबागांना विमा कवच मिळावे जेणेकरून शेतकरी हतास होणार नाही व कर्जबाजारी होण्यापासून वाचेल. शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे ही सर्व शेतकऱ्यांकडून मागणी होत आहे.
मी माझ्या शेतात दरवर्षी सात ते आठ लाख रुपयांचे डाळिंब पिकाचे उत्पन्न घेतो पण मात्र या वर्षी तेल्या व मर रोगामुळे एक रुपयाचे ही उत्पन्न बघावयास मिळणार नाही सर्व खर्च पूर्णपणे वाया जाण्याची भीती आहे “
( _माणिक भामरे , नुकसानग्रस्त शेतकरी_ )

कृषी विभागाने व महसूल विभागाने नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांची बागांची पाहणी करून योग्य पंचनामे करावे व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी”.
( _सुरेश भामरे)_
( _शेतकरी_ )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here