Home सोलापूर बार्शी ते तुळजापूर रस्त्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ...

बार्शी ते तुळजापूर रस्त्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ मर्यादित विभाग अंतर्गत ३४६ कोटी ७१ लाख रुपये मंजूर..

17
0

आशाताई बच्छाव

IMG_20240310_062251.jpg

बार्शी ते तुळजापूर रस्त्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ मर्यादित विभाग अंतर्गत ३४६ कोटी ७१ लाख रुपये मंजूर..

युवा मराठा न्युज पेपर अँड ऑनलाईन वेब पोर्टल महादेव घोलप.

आमदार राजेंद्र राऊत यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे यश आले.

सोलापूर

बार्शी तालुक्यातील महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांचा माध्यमातून तिर्थक्षेत्रांचा विकास करण्यासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी आमदार राजेंद्र राऊत यांनी मंजूर केला आहे,याचाच एक भाग म्हणून श्री भगवंताचे बार्शी ते धाराशिव जिल्ह्यातील आई तुळजाभवानी मातेचे तुळजापूर तिर्थक्षेत्र जोडणाऱ्या बार्शी ते तुळजापूर रस्ता सुधारणा करण्यासाठी ३४६ कोटी ७१ लाख रुपये मंजूर झाल्याची माहिती आमदार राजेंद्र राऊत यांनी दिली आहे.
बार्शी येथे जगातील एकमेव मंदिर आणि बार्शीचे ग्रामदैवत अंबरीष वरद श्री भगवंत मंदिर असुन या मंदिराला ऐतिहासिक वारसा आहे.बार्शी येथुन कोजागिरी पौर्णिमे निमित्ताने लाखो भावीक तुळजापूरला आई तुळजाभवानी मातेचे दर्शन घेण्यासाठी पायी चालत जातात.ही दोन्ही तिर्थक्षेत्रे जोडणाऱ्या बार्शी ते तुळजापूर रस्त्याची दुरावस्था झाली असल्याने भाविक,पर्यटकांसह या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या स्थानिकांची मोठी गैरसोय होत होती,या रस्त्याच्या कामामुळे बार्शी,शेलगाव,महागाव,मळेगाव, जामगाव पा,उपळे दुमाला,गौडगाव,संगमनेर,तुळजापूर आदी गावासह परीसरातील नागरीकांची सोय होणार आहे.
सदर रस्ता हा सोलापूर व धाराशीव दोन जिल्हयातून जाणारा महत्वाचा रस्ता आहे, किमी ५/८०० ते किमी ४२/६०० ही लांबी बार्शी तालुक्यातील असून किमी ४२/६०० ते ५२/००० हि लांबी तुळजापूर तालुक्यातील आहे. या रस्त्यावर बार्शी, तुळजापूर, इ. महत्वाची धार्मिक,पर्यटन व ऐतिहासिक क्षेत्राशी संबधित गावे आहेत,सदर रस्त्याची रुंदी १०.०० मीटर असून दोन्ही बाजूस १.०० मीटर रुंदीची बाजू पट्टी होणार आहे.या रस्त्याची निवीदा प्रसिद्ध झाली असून लवकरच प्रत्यक्षात कामाला सुरुवात होणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब,उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे बार्शी तालुक्यातील जनतेच्या वतीने आमदार राजेंद्र राऊत यांनी आभार व्यक्त केले..

Previous articleभुयार येथे तालुकास्तरीय दिव्यांग प्रमाणपत्र तपासणी शिबिराला उस्फूर्त प्रतिसाद
Next articleश्रीक्षेत्र थेटाळे येथे महाशिवरात्री उत्सवानिमित्त संगीतमय श्री शिव महापुराण कथा–
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here