Home भंडारा भुयार येथे तालुकास्तरीय दिव्यांग प्रमाणपत्र तपासणी शिबिराला उस्फूर्त प्रतिसाद

भुयार येथे तालुकास्तरीय दिव्यांग प्रमाणपत्र तपासणी शिबिराला उस्फूर्त प्रतिसाद

34
0

आशाताई बच्छाव

IMG_20240310_061956.jpg

भुयार येथे तालुकास्तरीय दिव्यांग प्रमाणपत्र तपासणी शिबिराला उस्फूर्त प्रतिसाद

आरोग्य शिबिराच्या माध्यमातून अनेक गोरगरिबांना आरोग्यसेवेच्या लाभ– पंचायत समिती सभापती डॉ नूतन कुर्जेकर

संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी) पवनी तालुक्यातील भुयार येथे आरोग्य शिबिरात तज्ञ डॉक्टर सहकार्य करण्यासाठी येतात हे कौतुकास्पद बाब आहे या माध्यमातून अनेक गोरगरिबांना आरोग्यसेवा लाभ होतो.जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले ही संतांची शिकवण आहे संताची शिकवण आहे अशा पद्धतीने विविध व्याधीने ग्रस्त असलेल्या नागरिकांवर सदर दिव्यांग शिबिरामध्ये सामान्य रुग्णालय भंडारा येथील हड्डी रोग तज्ञ, मानसिक उपचार तज्ञ, नेत्ररोग तज्ञ, बहिरेपणा तज्ञ व भौतिक उपचार तज्ञ द्वारे दिव्यांग लोकांची तपासणी करून त्यांना दिव्यांग प्रमाणपत्र किंवा नूतनीकरण करण्यात येईल. शिबिराच्या माध्यमातून विनामूल्य उपचार करण्यात येणार आहे .म्हणून या शिबिराला विशेष महत्त्व आहे. या शिबिरात शंभरहून अधिक दिव्यांग नागरिकांची तपासणी करण्यात आली .भुयार येथे सदर शिबिर प्राथमिक आरोग्य केंद्रात ७ मार्च 2024 या कालावधीत घेण्यात आले होते .या शिबिराचे उद्घाटन पंचायत समिती सभापती डॉक्टर नूतन कुर्जेकर यांचे हस्ते करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून सुवर्णाताई रामटेके पंचायत समिती सदस्य , मंगलाताई अशोक बाळबुद्धे पंचायत समिती सदस्य, माजी सरपंच अशोक बाळबुद्धे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर ए एच कानडे ,ग्रामपंचायत सदस्य मेघराज जोगवे ,पत्रकार मनोज चिंचघरे, गणेश गणवीर ,ममता गणवीर, मेश्राम सिस्टर, यांच्यासह अधिकारी व कर्मचारी मान्यवर उपस्थित होते या शिबिराला भंडारा जिल्ह्यातील सामान्य रुग्णालयातील 20 तज्ञ डॉक्टरांची उपस्थिती होती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here