Home बीड संस्कार प्राथमिक शाळा विद्यानगर विभागात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

संस्कार प्राथमिक शाळा विद्यानगर विभागात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

13
0

आशाताई बच्छाव

IMG_20240310_061143.jpg

संस्कार प्राथमिक शाळा विद्यानगर विभागात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा विद्यार्थ्यांच्या हस्ते सत्कार करून महिला दिन साजरा.

बीड/परळी दि: ०९ शहरातील श्री पद्मावती शिक्षण संस्था संचलित, संस्कार प्राथमिक शाळा विद्यानगर विभागात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षा श्री पद्मावती शिक्षण संस्थेच्या सहसचिव श्रीमती. प्रेमिलाताई तांदळे मॅडम व प्रमुख पाहुण्या म्हणून सौ. स्वप्निता गुट्टे (डॉक्टर), सौ. मनीषा मुंडे (पोलीस), सौ. सोनिया मुंडे (वकील) सौ. प्रिया भद्रे (मेकअप आर्टिस्ट), सौ. अर्चना रोडे (समाजसेविका), सौ. विनिता राठोड (कंडक्टर), सौ.तांबडे (शेतकरी), कु.शुभांगी धस ( जिम कोच) कु. पूजा घुले (नेटवर्क मार्केटिंग), सौ. शितल चव्हाण (महसूल विभाग, परळी वैजनाथ), सौ. सारिका चाटे (कोतवाल),सौ. समीना खान (गृहिणी) सौ. शीतल शिंदे (नेटवर्क मार्केटिंग) तसेच विभागातील महिला शिक्षिका सौ .दहिफळे मॅडम, सौ. शेटकार मॅडम, सौ.चाटे मॅडम, सौ. गोरे मॅडम, सौ. जगताप मॅडम, सौ. फड मॅडम यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व शिक्षणमहर्षी कै. विठ्ठलरावजी तांदळे सर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले.
यावर्षी शाळेत जागतिक महिला दिन एका अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. यावेळी शाळेमध्ये शहरातील विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांना आमंत्रित करून त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार व सन्मान करण्यात आला.जागतिक महिला दिनानिमित्त शाळेतील विद्यार्थिनी डॉक्टर,वकील, नर्स, शिक्षिका , पोलीस ,आर्मी इत्यादी विविध क्षेत्रातील महिला कर्मचाऱ्यांचा पोशाख करून आल्या होत्या.
यावेळी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शाळेमध्ये विद्यार्थ्यांची वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली होती व विजेत्या विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वाटप करण्यात आले.त्यानंतर जागतिक महिला दिनानिमित्त शाळेतील सर्व शिक्षिकांना पद्मावती शिक्षण संस्थेचे सचिव श्री. दीपक तांदळे सर यांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती. फड मॅडम तर आभार श्री. संभाजी कराड सर यांनी मानले यावेळी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी आदींची उपस्थिती होती.

Previous article०३ लाख रुपये देऊन लग्न केले ; दोन महिन्यांतच नवरी घर सोडून पसार
Next articleभुयार येथे तालुकास्तरीय दिव्यांग प्रमाणपत्र तपासणी शिबिराला उस्फूर्त प्रतिसाद
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here